marraige (फोटो सौजन्य- pinterest)
हनीमूनच्या दिवशीच नव्या वधूला अनोख्या सत्वरीक्षेला सामोरे जावे लागले. हनीमुनलाच या वराने असा प्रश्न वधूला केला की तिला प्रश्न पडला की मग याने लग्न तरी केले कशाला ? सुहागरात सुरु व्हायच्यावेळी त्याची नवीन नवरी नटून थटून बिछान्यावर बसली होती. त्यावेळी या वराने तिला चक्क त्याच्या गर्लफ्रेंडचे फोटो दाखवले आणि तिला सांगितले की तु माझ्या गर्लफ्रेंडसारखी दिसत नाही आणि हा वर पुढे म्हणाला की आपण केवळ कुटुंबियांच्या इज्जतीसाठी हा विवाह केला आहे. मी आता हे लग्न तोडणार आहे. तुला माझ्या सोबत संबंध ठेवायचे असतील तुझ्या घरातून २० लाखांचा हुंडा आण. जेव्हा वधूने असे करण्यास नकार दिला तेव्हा त्याने तिला मारहाण करुन घरातून काढून टाकले.
PCMC Crime News: धक्कादायक! लघुशंका करताना शिंतोडे उडाल्याने तरुणाचा खून
नेमकं प्रकरण काय?
उत्तर प्रदेश येथील ही वधू कोतवाली देहात क्षेत्रात अनूपशहर रोड येथील आनंद विहार कॉलनीत राहणार आहे. या वधूचे नाव नाम हिना मलिक आहे. तिने तक्रारीत म्हटले आहे क तिचे लग्न 5 डिसेंबर 2022 रोजी गाजियाबाद येथील खोडा कॉलोनीच्या दानिश मलिक यांच्याशी मोठ्या धुमधडाक्यात झाला. निकाहानंतर नव्या नवरीच्या ‘ मुंह दिखाई’ची रस्म होत होती. त्यानंतर तिच्या पतीने आपल्या मोबाईल फोनमधील एक फोटो दाखवत तो म्हणाला की ही पाहा माझी गर्लफ्रेंड, किती सुंदर आहे. तु तिच्यासारखी नाही.
दानिश याने त्याच्या गर्लफ्रेंडचे नाव मुस्कान सांगत तिची सर्व माहीती नव्या नवरीला सांगितली. त्यानंतर आपले तिच्याशी पाच वर्षे संबंध असल्याचे सांगितले. त्याने सांगितले की आपण घरच्याच्या इज्जती मुळे लग्न केले आहे. पीडीत हिना मलिक हीने सांगितले की आपण आपल्या पतीचा छळ सहन करीत आले आहे. मला वाटले तो सुधारेल. माझ्या घरच्यांनी या लग्नासाठी सुमारे ३० लाख रुपये खर्च झाले आहे. अशात मी आता त्यांच्याकडे पैसे मागायला कुठे जाऊ..त्यानंतरही तिने पतीचा त्रास सहन केला. त्यानंतर त्याने मला घरातून हाकलून काढले.
पण तो 20 लाखांच्या हुंड्यावर अडून
हीना मलिक म्हणाल्या की माझ्या कुटुंबाने २० लाखाची व्यवस्था गेली नाही तर दानिश आणि त्याच्या कुटुंबियातील लोकांनी आपल्याला मारहाण केल्याचे हीना मलिक यांनी सांगितले. यानंतर आपण पती आणि सासरच्या मंडळींवर गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला आहे.