नागपूर : नागपूर शहरात एका शाळकरी मुलीची हत्या झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शाळेतून घरी जात असतांना तिच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आल्याची माहिती तपासातून समोर आली आहे. अजनी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गुलमोहर कॉलनीत हत्या झाली आहे. एकतर्फी प्रेमातून ही घटना घडल्याचा संशय पोलिसांना आहे. मृत मुलगी दहाव्या वर्गात शिक्षण घेत असल्याचे समोर आलं आहे. या घटनेने नागपूर शहर हादरलं आहे.
नेमकं काय घडलं?
हत्या झालेली १६ वर्षीय अल्पवयीन मुलगी आजीनी पोलीस स्टेशन हद्दीत असलेल्या शाळेतील विद्यार्थिनी आहे. शाळेतून घरी परत जाण्यास निघाली असतांना एका अल्पवयीन आरोपीने तिची वाद अडवली. त्यांनतर काही कळण्यापूर्वीच आरोपीने अल्पवयीन मुलीवर चाकूने सपासप वार केले, ज्यामध्ये ती रक्तबंबाळ अवस्थेत खाली कोसळली. हॉस्पिटलमध्ये नेण्यापूर्वी घटनास्थळी तिचा मृत्यू झाला. हल्ला केल्यानंतर आरोपी घटनासथळावरून पसार झाला होता. घटनेची माहिती मिळताच अजनी पोलीस ठाण्याचे निरीक्षक, पोलीस कर्मचारी व वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले.
आरोपी हा अल्पवयीन असल्याची माहिती समोर आली आहे. हत्या करण्यापूर्वी आरोपीने संबंधित विद्यार्थिनीला फोन केल्याची माहिती पुढे आली आहे. शाळा सुटल्यानंतर ती मुलगी घरी जात असतांना आरोपीने तिला वाटेतच गाठले आणि काही समजण्यापूर्वी आरोपीने तिच्यावर चाकूने वार केले. या घटनेबाबत पोलिसांनी सध्या तरी कोणतीही माहिती दिली नसून अधिकची प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे. मात्र पोलिसांकडून अधिक तपास सुरु असून आरोपीला अटक करण्यासाठी पोलिसांची अनेक पथक रवाना झाली आहे. या हत्याकांडाने नागपूर शहर हादरलं आहे.
उल्हासनगर हादरले! शौचालयात लघुशंकेसाठी गेलेल्या भावोजीवर त्याच्याच मेहूण्याने केला अंदाधुंद गोळीबार
उल्हासनगरमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. २७ ऑगस्ट रोजी रात्री १० वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. साईनाथ कॉलनीतील रहिवासी असलेले आणि आरोपीचा भावोजी योगेश मिश्रा आणि त्यांचा मित्र धीरज मिठाले हे सार्वजनिक शौचालयात गेले होते. त्याचवेळी मोनू शेख (मेहूणा) आणि त्याच्या साथीदारांनी अचानक त्यांच्यावर गोळीबार सुरू केला. या गोळीबारात योगेशच्या छातीत गोळी लागली. गोळीबारानंतर हल्लेखोरांनी धारदार शास्त्रे आणि तलवारीने त्यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात दोघेही गंभीर जखमी झाले आहेत.
6 महिने शारीरिक संबंध नाही, तरी अचानक पत्नी गर्भवती; कळताच नवऱ्याने गर्भासह….