लग्नाच्या सातव्या दिवशीच पत्नी गेली सोडून; नैराश्येत पतीची गळफास घेऊन आत्महत्या (File Photo : Suicide)
नागपूर : लग्नानंतर अवघ्या सात दिवसांत पत्नी माहेरी निघून गेली. संसार सुरू होण्यापूर्वीच तो उद्धवस्त झाल्याचा प्रकार घडला. यात प्रवीण रामचंद्र कुमरे (वय ३२, रा. मानेवाडा जुनी वस्ती) याने गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना हुडकेश्वर पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली. याप्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रवीण हा मजुरीचे काम करत होता. २०२५ मध्ये त्याचे लग्न झाले होते. मात्र, लग्नानंतर अवघ्या सातव्या दिवशी पत्नी सोडून माहेरी गेली. त्यानंतर ती पुन्हा सासरी परतली नाही. याचा प्रवीणला मोठा मानसिक धक्का बसला होता. त्यातून तो नैराश्येत गेला आणि हळूहळू त्याला व्यसन लागल्याचे सांगितले जाते. तसेच त्याने कामाकडेही दुर्लक्ष करण्यास सुरुवात केली होती.
शुक्रवारी मोठा भाऊ जितेंद्रने प्रवीणला कामावर जाण्याबाबत विचारले असता त्याने इच्छा नसल्याचे सांगितले. घरीच खोलीला शटर लावून दुकान काढले आहे. जी रिकामी होती. प्रवीण दुकानात गेले आणि शटर आतून बंद केले. सायंकाळी ६ वाजता जितेंद्रने घरी परतल्यानंतर प्रवीणबाबत विचारले असता दुकानाच्या खोलीत असल्याचे समजले. त्याने त्याला आवाज दिला. मात्र, कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.
संशय आल्याने पोलिसांनी दिली माहिती अन्…
संशय आल्याने जितेंद्रने पोलिसांना माहिती दिली. शटर उघडले असता प्रवीण आतमध्ये गळफास लावलेल्या अवस्थेत आढळला. पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे. घटनेमागे अन्य कोणतेही कारण सध्या समोर आले नाही. पत्नी सोडून गेल्याच्या धक्क्यातून त्याने हे टोकाचे पाऊल उचलल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.
आईसोबत झालेल्या आर्थिक वादातून आत्महत्या
आईसोबत झालेल्या आर्थिक वादाच्या रागातून एका ३८ वर्षीय ट्रॅव्हल्स व्यावसायिकाने घराच्या पाचव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. ही धक्कादायक घटना पंचवटीतील ढिकलेनगर परिसरात घडली आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.






