अनैतिक व्यवसायातून बांगलादेशी महिलांची सुटका, 3 फरार आरोपींचा शोध सुरू (फोटो सौजन्य-X)
नवी मुंबई: शिरवणे गावातील हॉटेल सत्यम हॉस्पिटॅलिटी मध्ये बांगलादेशी महिलांचा वापर वेश्या व्यवसायासाठी होत असल्याची माहिती मिळाली. यानंतर अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने कारवाई करून, त्यातून 5 महिलांची सुटका केली असून, 3 फरार आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत.
नेरूळ सेक्टर 1 मधील शिरवणे गावात अनेक अनधिकृत धंदे चालतात चालत असल्याचा नागरिकांच्या वारंवार तक्रारी येत आहेत. अशातच गुन्हे शाखेने वेश्याव्यवसायातून 5 बांगलादेशी महिलांची सुटका केली आहे. हॉटेल सत्यम हॉस्पिटॅलिटी मध्ये बांगलादेशी महिलांकडून वेश्याव्यवसाय करून घेतला जात असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून माहिती मिळाली. त्यानंतर सदर माहितीची सहानिशा करण्यासाठी गुन्हे शाखेने बनावट ग्राहक पाठविण्यात आले.
शाहीन शिराजुल मंडल याला ऑनलाईन पैसे पाठवून लॉजवर गेले असता, मिळालेल्या माहितीची खात्री होताच अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने, सदर ठिकाणी छापा मारून 5 बांगलादेशी महिलांची या वेश्याव्यवसायातून सुटका केली आहे. ग्राहकाला महिला दाखवणारा वेटर अरविंदकुमार देवलाल जाधव, या आरोपीला गुन्हे शाखेने अटक केली आहे. तर वेश्याव्यवसायासाठी ऑनलाइन पैसे स्वीकारणारा आरोपी साहिल उर्फ शाहीन शिराजुल मंडल, व महिलांना वेश्याव्यवसायासाठी लॉजवर पाठवणारा आरोपी शंभू मुनीलाल उपाध्याय या दोन आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत.
नेरुळ परिसरात चाललेल्या या अवैद्य धंद्यांवर स्थानिक पोलिसांचे दुर्लक्ष होत असल्याने, या हद्दीत अमली पदार्थ विरोधी पथक हे धाड मारून नशा मुक्त नवी मुंबई मोहिमेला बळकटी देत आहेत. तर अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष येथील लॉजवर कारवाई करून वेश्याव्यवसायातून महिलांची सुटका करताना दिसून येत आहे. मात्र नेरुळ पोलीस या अनैतिक हालचालींवर दुर्लक्ष करत असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे.