छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यातील भालगाव येथील भाजप युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष गणेश रघुनाथ टेमकर (वय 30) यांचा मृतदेह आढळला आहे. मृत्यूचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. या घटनेने संपूर्ण गंगापूर तालुक्यात खळबळ उडाली आहे. मृतदेह शुक्रवारी (दि. 14) दुपारी गंगापूर तालुक्यातील हदियाबाद-नारवाडी रस्त्यालगत, नारवाडी शिवारातील नळकांडी पुलाजवळ आढळला. याघटनेची माहिती स्थानिक सरपंच आसिफ पटेल आणि समाजसेवक गौरव विधाटे यांनी पोलिसांना तात्काळ दिली. पोलीस निरीक्षक यांच्या नेतृत्वाखाली पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालय, गंगापूर येथे पाठवण्यात आला आहे.
मृत्यूचे कारण अस्पष्ट
गणेश रघुनाथ टेमकर यांच्या मृतदेहावर कोणत्याही मारहाण किंवा शस्त्राने केलेल्या हल्ल्याचे ठसे आढळले नाहीत. तसेच कोणत्याही वाहनाने धडक दिल्याचेही स्पष्ट चिन्हे घटनास्थळी आढळली नाहीत. त्यामुळे अपघातामुळे ही घटना घडली की घातपातामुळे यावर संशय व्यक्त केला जात आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहे.
भाजप युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष
गणेश रघुनाथ टेमकर हे भाजप युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष होते. त्यांचा मृत्यू भाजपच्या स्थानिक वर्तुळात धक्का देणारा आहे, आणि त्यांचे निधन झाल्याने भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये शोककळा पसरली आहे. ते भालगाव येथील रहिवासी होते आणि त्यांच्या अचानक मृत्यूने स्थानिक स्तरावर एक मोठा गोंधळ उडवला आहे.
पोलिसांकडून तपास सुरु
गंगापूर पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. तपासाअंती शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यावर मृत्यूचे कारण स्पष्ट होईल असे पोलिसांनी सांगितले आहे.या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि तपास सुरू आहे.
विवाहित मुलगी घर सोडून गेल्याने आईची आत्महत्या, कुटुंब थेट मृतदेह पोलीस ठाण्यात घेऊन आले अन्…
महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील उस्मानपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक खळबळजनक घटना घडली आहे. २० वर्षीय विवाहित महिला पूजा तिच्या प्रियकरासोबत पळून गेल्यानंतर तिच्या आईने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार दाखल करण्यात आली तेव्हा कुटुंबाने वेळेवर कारवाई न केल्याचा आणि पैशांची मागणी केल्याचा आरोप केला आहे. या घटनेमुळे संतप्त झालेल्या कुटुंबाने मृतदेह थेट उस्मानपुरा पोलीस ठाण्यात आणला. अखेर प्रियकर आणि त्याच्या कुटुंबाविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आणि मृतदेह ताब्यात घेण्यात आला.
डिजिटल अरेस्टच्या नावावर दोघांना गंडा; तब्बल दोन कोटींची केली फसवणूक
Ans: नाही
Ans: शक्य
Ans: होय






