संग्रहित फोटो
कोल्हापूर : राज्यात चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. राज्यातील वेगवेगळ्या भागातून चोरीच्या घटना उघडकीस येत असतात. अशातचं आता मुक्तसैनिक वसाहत परिसरातील बंद फ्लॅट फोडून चोरट्यांनी दीड लाख रुपये रोख रक्कम आणि इतर किमती वस्तू असा सुमारे सहा लाखांचा मुद्देमाल लंपास केला आहे. सकाळी ९ वाजता हा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी जयकुमार जनार्दन करवडे (वय ५७, रा. श्रीकृष्ण सरस्वती अपार्टमेंट, मुक्तसैनिक वसाहत) यांनी शाहुपूरी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
फिर्यादी जयकुमार करवडे यांची मुलगी डॉक्टर असून ती इचलकरंजीत असते. मुलगा खासगी नोकरी करतो. करवडे दाम्पत्य मंगळवारी सायंकाळी ६.३० वाजता मुलीकडे इचलकरंजीला गेले होते. मुलगा राजवर्धन याची रात्रपाळीची डयुटी असल्याने मंगळवारी रात्री ११.४० वाजता तो घरातून ड्यूटीसाठी गेला. बुधवारी सकाळी ९ वाजता राजवर्धन घरी आला असता फ्लॅटचा कडीकोयंडा उचकटलेला दिसला. त्याने आत जाऊन पाहिले असता तिजोरी फोडली होती. इतरत्र साहित्य विस्कटलेले होते.
राजवर्धन यांनी तात्काळ वडिलांना घटनेची माहिती दिली. करवडे दाम्पत्य इचलकरंजीतून घरी आले. जनार्दन करवडे यांनी शाहुपूरी पोलिसांना घटनेची माहिती दिली. घटनास्थळी पोलिस दाखल झाले. त्यांनी पंचनामा केला. श्वान पथकाला पाचारण करण्यात आले. परंतू परिसरातच श्वान घुटमळले. यावरून चोरी केल्यानंतर चोरटे दुचाकीने तेथून पळाले असावेत, असा अंदाज वर्तविला जात आहे .
हे सुद्धा वाचा : तलाठ्यासाठी लाच घेणं भोवलं; सापळा रचून एकाला रंगेहात पकडले
पुन्हा तेच चोरटे ॲक्टीव्ह?
पुण्यात सहा वर्षांपुर्वी सोनसाखळी चोरट्यांनी मोठ्या प्रमाणात धुमाकूळ घातला होता. दिवसाला तीन ते चार सोनसाखळी चोरीच्या घटना घडत असत. पादचारी महिला तसेच ज्येष्ठ महिला या चोरट्यांच्या टार्गेटवर असत. तीन राज्यात या टोळ्यांनी मोठा गोंधळ घातला होता. पुणे पोलिसांनी तीन राज्यातील माहिती एकत्रित करून या चोरट्यांचा माग सुरू केला होता. नंतर यातील काही टोळ्यांना पकडण्यात यश देखील आले होते. त्यांच्यावर मोक्कासारखी कारवाई देखील केली होती. नंतर या घटना थांबल्या होत्या. परंतु, आता पुन्हा सहा वर्षांनी सोन साखळी टोळ्या ॲक्टीव्ह झाल्याचे गेल्या काही महिन्यांपासून दिसत आहे. त्यामुळे पुन्हा तेच चोरटे ॲक्टीव्ह झाले आहेत का ? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
औंध भागात ४ लाखांची घरफोडी
औंध भागातील सानेवाडी ओझन मॉल परिसरातील एका सोसायटीतल बंद फ्लॅट फोडून चोरट्यांनी ३ लाख ९० हजारांचा ऐवज चोरून नेला आहे. याप्रकरणी चतु:श्रृंगी पोलिसांत ७५ वर्षीय ज्येष्ठाने तक्रार दिली आहे. सोमवारी रात्री हा प्रकार समोर आला आहे. तक्रारदार रविवारी सायंकाळी घराला कुलूप लावून गेले असता चोरट्यांनी त्यांच्या घराचे कुलूप उचकटून आत प्रवेश केला. घरातील रोकड व दागिने असा ३ लाख ९० हजारांचा ऐवज चोरला.