संग्रहित फोटो
पुणे : पुण्यात चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. पुण्यातील वेगवेगळ्या भागातून चोरीच्या घटना उगडकीस येत असतात. अशातचं आता कारचालकांकडे बतावणी करुन चोरट्यांनी सोन्याचे दागिने, लॅपटॉपप आणि रोकड असा दीड लाख रुपयांचा ऐवज चोरुन नेल्याची घटना हडपसर भागात घडली आहे. याप्रकरणी चोरट्यांविरुद्ध हडपसर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याबाबत एका मोटारचालकाने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार काररचालक शुक्रवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास हडपसर भागातील रवीदर्शन परिसरात असलेल्या व्यापारी सकुंलात खरेदीसाठी निघाले होते. त्यावेळी कारच्या परिसरात थांबलेल्या चोरट्याने तक्रारदाराकडे रस्त्यात पैसे पडल्याची बतावणी केली. कार चालकाचे लक्ष नसल्याची संधी साधून चोरट्याने कारमधील सोन्याचे दागिने आणि रोकड चोरुन नेली. याच भागात आणखी एका कारचालकाकडे बतावणी करुन चोरट्यांनी कारमधील लॅपटाॅप आाणि रोकड चोरून नेली आहे. पोलीस उपनिरीक्षक महेश कवळे अधिक तपास करत आहेत.
ह् सुद्धा वाचा : खळबळजनक! महिलेच्या गळ्याला तलवार लावून चोरीचा प्रयत्न; शिरुरमधील घटना
महिलांकडील मोबाइल लंपास
पुणे शहरात दुचाकीस्वार चोरट्यानी धुमाकूळ घातला असून, पादचारी महिलांकडील दागिने तसेच मोबाइल चोरून नेण्याच्या घटनांत वाढ झाली आहे. प्रभात रस्त्यावरील हिरवाई उद्यान येथे दुचाकीस्वार चोरट्यांनी पादचारी महिलेकडील मोबाइल चोरून नेल्याची घटना घडली. नगर रस्त्यावरील वाघोली भागात दुचाकीस्वार महिलेच्या गळ्यातील साडेतीन लाखांचे मंगळसूत्र चोरट्यांनी चोरून नेले, तर हडपसरमध्ये ज्येष्ठ महिलेचे मंगळसूत्र चोरण्याचा प्रयत्न झाला. सातत्याने या घटना घडत असताना पोलिसांना मात्र या चोरट्यांचा थांगपत्ता लागत नसल्याचे वास्तव आहे. याप्रकरणी ५२ वर्षीय महिलेने डेक्कन पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. तक्रारदार महिला प्रभात रस्त्यावरील गल्ली क्रमांक १५ परिसरातील सोसायटीत राहायला आहेत. त्या बुधवारी सायंकाळी प्रभात रस्ता परिसरातील हिरवाई उद्यान परिसरात चालायला गेल्या होत्या. तेथून त्या घरी निघाल्या होत्या. त्यावेळी त्यांच्या मोबाइलवर वहिनीचा फोन आला. त्यामुळे त्या मोबाइलवर बोलत पायी चालत असताना गल्ली क्रमांक १५ परिसरातील सिंबायोसिस शाळेसमोर महिलेच्या हातातील २० हजारांचा मोबाइल चोरून दुचाकीस्वार चोरटे पसार झाले. चोरट्यांनी हेल्मेट परिधान केले होते. सहायक पोलीस फौजदार राजेंद्र मारणे तपास करत आहेत. अनेक वर्षानंतर पुन्हा सोनसाखळी चोरटे सक्रिय झाले असून, त्यांनी चांगलाच उच्छाद घातला आहे. शहरात हे चोरटे महिलांना सॉफ्ट टार्गेट करत असून, एकट्या लोणीकंद पोलीस ठाण्याच्या हद्दीत पाच सोनसाखळी चोरीच्या घटना घडल्या आहेत.