लोणंद येथे तरूणाचा निघृण खून
लोणंद: लोणंद येथील इंदिरानगर भागातील बिरोबा मंदिरात आज दुपारी साडेबाराच्या सुमारास कोरेगाव येथील किरण किसन गोवेकर रा. कोरेगाव ता. फलटण याचा निघृण खून करण्यात आल्याची खळबळजनक घटना घडली. याबाबत घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार इंदिरानगर येथील बिरोबा मंदिराचे पुजारी अनिल कोळेकर हे दुपारी मंदिरात आराम करण्यासाठी आले असता त्यांना त्याठिकाणी किरण किसन गोवेकर हा रक्ताच्या थारोळ्यात मृतावस्थेत पडलेला दिसून आला.
याबाबत त्यांनी तातडीने लोणंद पोलीसांशी संपर्क साधला असता लोणंद पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आल्यानंतर मृतदेह लोणंद येथील प्राथमिक आरोग्य केंद्र येथे शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून या प्रकरणी सपोनि सुशिल बी. भोसले यांचे मार्गदर्शनाखाली पोउनि विशाल कदम, मपोउनि. ज्योती चव्हाण, पोहवा चंद्रकांत काकडे, पोकॉ. सचिन कोळेकर यांनी आरोपींची माहीती घेत संशयित आरोपी सतीश भाऊसो काळे व रोहीत शिवाजी डेंगरे या दोघांना गुन्हा घडल्यानंतर अवघ्या तासाभरात ताब्यात घेण्यात यश मिळवले. या गंभीर गुन्ह्याचा पुढील तपास सपोनी सुशील भोसले करत आहेत.
जेलमधून सुटलेल्या आरोपीने केली पुन्हा एक हत्या
कल्याणमध्ये तुरुंगातून सुटलेला आरोपी पुन्हा एकदा गुन्हेगारीच्या दिशेने गेल्याची घटना घडली आहे. या आरोपीने पैशांची गरज असल्याने त्याने एका वृद्ध महिलेचा जीव घेतला आहे. व्यवसायासाठी पैशांची गरज असल्याने त्याने हे कृत्य केले आहे. पाणी मंगण्याच्या बहाण्याने हा आरोपी वृद्ध महिलेच्या घरात शिरला. त्यानंतर तीची हत्या करून दागिने चोरी केले. दरम्यान या आरोपीला खडकपाडा पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
कल्याणच्या आंबिवली परिसरात राहणाऱ्या ७४ वर्षीय रंजना पाटकर यांची हत्या करून त्यांचे सोन्याचे दागिने लांबवणाऱ्या गुन्हेगाराला खडकपाडा पोलिसांनी अटक केली आहे. चांद उर्फ अकबर शेख (३०) असे अटकेत असलेल्या आरोपीचे नाव असून, तो यापूर्वीही हत्या प्रकरणात दोषी आढळून आला होता. चांगली वर्तणूक असल्यामुळे त्याला काही महिन्यांपूर्वी त्याची सुटका करण्यात आली होती.
जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही! जेलमधून सुटलेल्या आरोपीने केली पुन्हा एक हत्या; कल्याणमधील घटना
जेलमधून सुटल्यानंतर तो आंबिवलीमध्ये आपल्या कुटुंबासोबत राहत होता. मात्र, मोमोज विक्रीसाठी व्यवसाय सुरू करायचा असल्याने पैशांची गरज होती. त्यामुळे त्याने काही दिवस रंजना पाटकर यांच्या घराची रेकी केली. २० मार्च रोजी आरोपीने पाणी मागण्याच्या बहाण्याने वृद्धेच्या घरी प्रवेश केला. टीव्हीचा आवाज वाढवून त्याने आरडाओरडा ऐकू येऊ नये याची काळजी घेतली आणि नंतर महिलेचा गळा दाबून खून केला. तिच्या गळ्यातील मंगळसूत्र व कानातील कर्णफुले मिळून सुमारे १.०५ लाखांचे दागिने लंपास केले. याप्रकरणी मयतच्या कुटुंबाचा दुसऱ्यावरती संशय होता. त्यामुळे पोलिसांनी एक संशयित आरोपीला ताब्यात घेऊन त्याला न्यायालयात हजर केले व सध्या तो कल्याण आधारवाडी जेलमध्ये आहे.