लोणावळा विसापूर किल्ला फिरायला आलेल्या मुलीवर पोलिसाने अत्याचार केला (फोटो - सोशल मीडिया)
वडगाव मावळ : राज्यामधील महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण दिवसेंदिवस वाढले आहे. लहान मुलींपासून अगदी महिलांवर देखील नराधम अत्याचार करत आहे. रोज नवीन धक्कादायक घटना समोर येत असल्यामुळे राज्यामध्ये कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत आहे. आता लोणावळ्यामध्ये देखील धक्कादायक प्रकार घडला आहे. मावळ तालुक्यातील विसापूर किल्ला परिसरात आई- वडिलांसोबत फिरण्यासाठी आलेल्या पाच वर्षाच्या चिमुकलीवर बंदोबस्तावर असलेल्या पोलिसाने लैंगिक अत्याचार केला. मुलीला चॉकलेटचे आमिष दाखवून आडोशाला नेऊन तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. लोणावळा ग्रामीण पोलिसांनी संबंधित पोलिसाला अटक केली आहे. ही धक्कादायक घटना बुधवारी (दि. 25) घडली.
सचिन वसंत सस्ते असे अटक केलेल्या आरोपी पोलिसाचे नाव आहे. याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांनी दिलेल्या माहितीनुसार, नाताळनिमित्त मावळ तालुक्यातील पर्यटन स्थळांवर पोलिसांकडून अधिकचा बंदोबस्त लावण्यात आला होता. पर्यटन स्थळावर सुट्टीच्या अनुषंगाने लोक फिरण्यासाठी येतात. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी चोख बंदोबस्त लावला होता. लोणावळा ग्रामीण पोलिसांच्या हद्दीत येणाऱ्या विसापूर किल्ल्यावर पुणे ग्रामीण मुख्यालय येथून अधिकचा बंदोबस्त मागविण्यात आला होता. त्यामध्ये पोलीस सचिन सस्ते हा देखील विसापूर किल्ला परिसरात बंदोबस्तावर होता.
राजकीय घडामोडी वाचण्यासाठी येथे क्लिक करा
विसापूर किल्ला पाहण्यासाठी पाच वर्षीय चिमुकली तिच्या आई-वडिलांसोबत आली होती. त्या चिमुकलीला सचिन सस्ते याने चॉकलेटचा आमिष दाखवले आणि आडोशाला नेले. तिथे तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार मुलीने आपल्या पालकांना सांगितला. पालकांनी तात्काळ पोलिसात धाव घेत गुन्हा दाखल केला. लोणावळा ग्रामीण पोलिसांनी पोलीस सचिन सस्ते याला अटक केली आहे.पोलिसांकडून कृत्ये झाल्याने रक्षकच झाले भक्षक यामुळे सर्वच स्तरातून संताप व्यक्त केला जात आहे.
आरोपी पोलीस मद्यधुंद
विसापूर किल्ल्याच्या पायथ्याला हा प्रकार घडला. कर्तव्यावर असताना हा पोलीस दारूच्या नशेत होता, याचं नशेत त्याने पाच वर्षीय चिमुरडीसोबत अश्लील चाळे केलेत. याप्रकरणी सचिन सस्तेला लोणावळा ग्रामीण पोलिसांनी बेड्या ठोकल्यात. नाताळची सुट्टी असल्यानं पर्यटक विसापूर किल्ल्यावर गर्दी करत होते. म्हणून नराधम पोलीस सस्ते तिथं बंदोबस्तावर होता.
क्राईम न्यूज वाचण्यासाठी येथे क्लिक करा
वाराणसीमध्ये चिमुकलीवर अत्याचार
वाराणसीमध्ये सकाळी एका मुलीचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. शाळेच्या आत मृतदेह सापडला असून मुलगी एक दिवशी आधी संध्याकाळी बेपत्ता होती. हे प्रकरण रामनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सुजाबादचे आहे. येथील रहिवासी असलेल्या ८ वर्षीय मुलीचा मृतदेह बुधवारी सकाळी बहादूरपूर येथील प्राथमिक शाळेत गोणीत बांधलेल्या अवस्थेत आढळून आला. मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिच्या मृतदेहाची विल्हेवाट लावल्याचा संशय आहे. रामनगर पोलीस सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून घटनेचा तपास करत आहेत. या प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. माहिती देताना अपंग वडिलांनी पोलिसांना सांगितले की, मुलगी मंगळवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास समाधीजवळील दुकानातून सामान आणण्यासाठी घरातून निघाली होती. ती मच्छरचं कॉइल घेण्यासाठी बाहेर गेली होती.