कळंबोलीत मोठी अंमली पदार्थ कारवाई , 15.83 लाखांचा हेरॉईन आणि गांजा जप्त
ही कारवाई सोमवारी दुपारी २.५० वाजता करण्यात आली. गोपनीय माहितीच्या आधारे टाकलेल्या या छाप्यात राजन राठोड हा कळंबोली स्टील मार्केट येथे अमली पदार्थ विक्री करताना आढळून आला. त्यास ताब्यात घेऊन कळंबोली पोलीस ठाण्यात एन.डी.पी.एस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीस २१ ऑक्टोबर रोजी न्यायालयात हजर करण्यात आले असता, त्याला २४ ऑक्टोबर 2025 पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
अमली पदार्थ विरोधी (ANC) पथकाला कळंबोली स्टील मार्केट परिसरात राजन राठोड नावाचा इसम अमली पदार्थांची विक्री करत असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे, 20 ऑक्टोबर 2025 रोजी दुपारी 2.50 वाजता ANC पथकाने तात्काळ सापळा रचून छापा टाकला. या छाप्यात आरोपी राजन राठोड पोलिसांना दिसून आला. त्याची झडती घेतल्यावर त्याच्याकडून एकूण 15 लाख 83 हजार रुपये (रुपये 15.83 लाख) किमतीचा अमली पदार्थ जप्त करण्यात आला, ज्यात खालील साहित्याचा समावेश आहे:
राजन राठोड हा अट्टल गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध विविध पोलीस ठाण्यांमध्ये एनडीपीएस ऍक्ट कायदा आणि भारतीय दंड विधान (आय पी सी ) अंतर्गत एकूण 8 गंभीर गुन्हे दाखल आहे जसा की उरण पोलीस ठाणे, ५ गुन्हे – शिवाजी नगर पोलीस ठाणे, देवनार पोलीस ठाणे,आर सी अफ पोलीस ठाणे या ठिकाणी आरोपीवर गुन्हा दाखल आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक संदीप निगडे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. अमली विरोधी पथकाच्या या यशस्वी कारवाईमुळे कळंबोली परिसरात अमली पदार्थांच्या प्रसाराला मोठा आळा बसण्याची शक्यता आहे.
अमली पदार्थ विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप निगडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही यशस्वी कारवाई पार पडली. या कारवाईमुळे नवी मुंबई परिसरातील अमली पदार्थांची पुरवठा साखळी (Drug Supply Chain) तोडण्यात पथकाला मोठे यश मिळाले असून, अमली पदार्थ तस्करांना मोठा धक्का बसला आहे. सणासुदीच्या काळात अमली पदार्थ विरोधी मोहीम तीव्र केली असून, यापुढेही अशा कारवाया सुरू राहतील, असे या पथकातील अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.






