वाहनांच्या शोरूमला भीषण आग; 4 गाड्या जळून खाक, अग्निशमन दलाने काही क्षणातच...
नागपूर : नागपुरात एका वाहनांच्या शोरूमला भीषण आग लागली. शॉर्ट सर्किट झाल्याने इलेट्रिक वाहनांच्या शोरूममध्ये आग लागल्याचे सांगण्यात येत आहे. पाहता-पाहता आगीने रौद्ररूप धारण केले. शोरूम मालक आणि कर्मचाऱ्यांनी सुरूवातीला आगीवर नियंत्रणासाठी प्रयत्न केले. मात्र, आग वाढतच चालल्याने त्यांनी जीव वाचवण्यासाठी बाहेर पळ काढला. घटनेची माहिती अग्निमशन विभागाला देण्यात आली.
सक्करदरा केंद्रातून तात्काळ एक बंब घटनास्थळी पोहोचले. पाण्याचा मारा करून आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले. मात्र, तोपर्यंत या आगीत चार दुचाकी वाहन व इतर साहित्य पूर्णतः जळून खाक झाल्या होत्या. अग्निशमन विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, दिघोरी रिंग रोडवर तिरूपती टॉवरमध्ये जोगेंद्र मोहन यांचे जे. एम. मोटर्स नावाने इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांचे शोरूम आहे. शोरूममध्ये विविध कंपन्यांची वाहने ठेवली आहेत. शोरूममध्ये वाहनांची विक्री करण्यासाठी ४ कर्मचारी ठेवले आहेत. शनिवारी सायंकाळी साडेचारच्या सुमारास अचानक शोरूममध्ये आग लागली.
दरम्यान, सर्वत्र धूर पसरल्याने मालक आणि कर्मचाऱ्यांचे आगीकडे लक्ष गेले. त्यांनी तात्काळ आगीवर नियंत्रणासाठी प्रयत्न सुरू केले. मात्र, काही वेळातच आगीने रौद्ररूप धारण केले आणि एकच खळबळ उडाली. सर्वांनी जीव वाचविण्यासाठी शोरूममधून बाहेर पळ काढला. घटनेची माहिती अग्निशमन विभागाला देण्यात आली.
अग्निशमन विभागाची घटनास्थळी तात्काळ धाव
सक्करदरा केंद्रातून तात्काळ एक बंब घटनास्थळी पोहोचले. चारही बाजूंनी पाण्याचा मारा करण्यात आला. जवळपास तासाभराच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले. मात्र, तोपर्यंत या आगीत चार दुचाकी वाहने, गाडी चार्जर, काऊंटर, गाड्यांची सीट व बॉडी आदी जळून मोठे नुकसान झाले होते. सुदैवाने मालक व कर्मचाऱ्यांनी वेळीच पळ काढल्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याची माहिती सध्या दिली जात आहे.
संभाजीनगरमध्ये कंपनीत भीषण आग
वाळूज येथील एका फार्मा कंपनीत भीषण आग लागून दुर्घटना घडली होती. त्यानंतर वाळूज औद्योगिक वसाहतीतील सुप्रीम सिलिकॉन्स या केमिकल कंपनीत सोमवारी दुपारी झालेल्या स्फोटानंतर कंपनीत असलेल्या केमिकलमुळे मोठी आग लागली. स्फोट इतका मोठा होता की, कंपनीतील सर्व खिडक्या आणि दरवाजे तुटून उडाले. या आगीत दोन कामगार गंभीररित्या भाजले असून, त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे समजते.
हेदेखील वाचा : Goa Arpora fire : गोव्यातील अग्नितांडवावर PM मोदींकडून शोक व्यक्त; मृतांच्या वारसांना मिळणार 2 लाखांची मदत






