फोटो सौजन्य - Social Media
सावन वैश्य / नवी मुंबई:- दिनांक १० मार्च रोजी क्लासला गेलेला अथर्व चाळके हा घरी परत न आल्याने, अथर्वच्या आई-वडिलांनी मित्राकडे तसेच परिवारात तपास करून देखील मिळून आल्याने अथर्वच्या आई-वडिलांनी एन आर आय पोलीस ठाण्यात अथर्व हरवल्याची तक्रार देताच, उपायुक्त पंकज डहाने यांनी तीन पथके तयार करून, सीसीटीव्ही तपास व शोध मोहीम राबवून 15 दिवसात अथर्वचा शोध घेतला, व त्याच्या पालकांच्या स्वाधीन केले. याबाबत अथर्वच्या आई-वडिलांनी उपायुक्त पंकज दहाणे व पथकाचे अभिनंदन करत आभार मानले आहेत.
अकरा वर्षीय अथर्व हा करावे गाव, सेक्टर 36 मध्ये राहायला आहे. दिनांक 10 मार्च रोजी अथर्व क्लासला जातो म्हणून घराबाहेर पडला, मात्र क्लास सुटून वेळ झाली तरी अथर्व घरी परतला नाही.
शेवटी वाट बघून अथर्वच्या आईने क्लास मध्ये फोन केला असता क्लास सुटून वेळ झाला, अथर्व केव्हाच गेला असल्याची माहिती मिळाल्यावर अथर्वच्या आई वडिलांनी मित्रांकडे चौकशी केली, व आसपास परिसरात शोध घेतला मात्र अथर्व मिळून न आल्याने अथर्वच्या आई-वडिलांनी एन आर आय पोलीस ठाण्यात धाव घेतली व अथर्व हरवल्याची तक्रार नोंद केली. सदर घटनेची पोलीस उपयुक्त पंकज डहाणे यांना माहिती होताच घटनेचे गांभीर्य लक्षात घेत डहाणे यांनी 3 पोलीस ठाण्यातील सहाय्यक निरीक्षक सचिन ढगे, उपनिरीक्षक आकाश ठाकरे, विष्णू वाघ, पोलीस हवालदार विजय देवरे, जितेंद्र पाटील, पोलीस नाईक दामोदर वाघमारे, माणिक डोंबाळे, प्रशांत वाघ, मनोहर इंगळे, सोनावणे आदींचे पथक स्थापन केले व शोधमोहीम घेण्यासाठी मार्गदर्शन केले.
तसेच यामध्ये सामाजिक कार्यकर्ते आकाश रामाने यांची देखील मदत घेण्यात आली. पोलीस पथकाला मिळालेल्या मार्गदर्शनानुसार परिसरातील सुमारे अडीचशे ते तीनशे सीसीटीव्ही फुटेज तपासले, व त्यानुसार शक्यता असलेल्या ठिकाणी कोंबिंग ऑपरेशन राबवले . सलग 13 ते 14 दिवस घटना स्थळ व परिसरातील सर्व घटकांना अथर्वची विचारपूस केली असता, अथर्व हा नेरुळ रेल्वे स्थानक परिसरात असल्याची माहिती पथकाला मिळतात पथकाने रेल्वे स्थानक परिसरात धाव घेऊन अथर्वला ताब्यात घेतले व त्याच्या आई-वडिलांना बोलवून त्यांच्या स्वाधीन केले.
हरवलेलं पाडस तब्बल पंधरा दिवसांनी परत मिळाल्यावर मातेच्या अश्रूंचा बांध फुटला व अथर्वला उराशी कौटाळून माऊली रडू लागली. माय लेकराची ताटातूट होण्यापासून पोलिसांनी रोखल्याने अथर्वच्या आई वडिलांनी परिमंडळ एकचे पोलीस उपायुक्त पंकज डहाणे व अथर्वचा रात्रंदिवस शोध घेणारे पोलीस पथक यांचे आभार मानले आहेत. हरवलेल्या मायलेकरांची पुन्हा भेट घडवून दिल्याबद्दल नवी मुंबई पोलिसांचे नागरिकांकडून तोंड भरून कौतुक होत आहे.