अवैध विदेशी मद्य वाहतुकीवर कारवाई (फोटो- istockphoto)
अवैध विदेशी मद्य विक्री व वाहतुकीवर मोठी कारवाई
उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई
सापळा रचून ट्रकची तपासणी करण्यात आली
Mumbai Crime News: अवैध विदेशी मद्य विक्री व वाहतुकीवर उत्पादन शुल्क विभाग नियमित कारवाई करीत असतो. उत्पादन शुल्क विभागाने अवैध विदेशी मद्य वाहतुकीवर कारवाई करत २.२२ कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ठाणे जिल्ह्यातील तळोजा रूफिंग उद्योगसमोर, सदुद्दीन इस्टेट, मुंब्रा – पनवेल रस्ता, मंजरली येथे गोपनीय माहितीच्या आधारे सापळा रचून ट्रकची तपासणी केली असता त्यामध्ये मागील बाजूस मोठ्या प्रमाणात अवैध विदेशी मद्याचा साठा आढळून आला. या ट्रकमध्ये विविध ब्रँडच्या विदेशी मद्याचे एकूण १,५६० बॉक्स आढळले.
या प्रकरणी वाहनांमधील दोघांना महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम १९४९ चे विविध कलमान्वये गुन्हा नोंद करून अटक करण्यात आली. या कारवाईमध्ये १२ चाकी चॉकलेटी रंगाचा ट्रक क्रमांक आर जे ५२ जीए ३७६२ सह परराज्यातील विदेशी मद्याचे १,५६० बॉक्स, तीन मोबाईल असा अंदाजित २ कोटी २२ लाख ६९ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपींमध्ये वाहन चालक साहिद मेहमूदा खान (वय ४९) रा. छायसा ता. हाथिन जि. पलवल (हरियाणा) आणि पंकज जगदीश साकेत (वय २५) रा. कलवारी ता. तेऊथर जि. रीवा (मध्यप्रदेश) यांचा समावेश आहे.
गांजा विक्री करणाऱ्या तरुणाला ठोकल्या बेड्या
गांजा विक्रीप्रकरणात पुन्हा पोलिसांनी एका तरुणाला बेड्या ठोकल्या आहेत. त्याच्याकडून गांजा, दुचाकी, मोबाइल असा ८० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. वानवडी भागात ही कारवाई करण्यात आली आहे. तौफिक रझाक शेख (वय २६, रा. नवाजीश चौकाजवळ, मीठानगर, कोंढवा खुर्द) असे अटक केलेल्याचे नाव आहे. ही कारवाई वानवडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक विजयकुमार डोके, सहायक निरीक्षक उमाकांत महाडिक, अमोल पिलाणे, अतुल गायकवाड व त्यांच्या पथकाने केली.
गांजा विक्री करणाऱ्या तरुणाला ठोकल्या बेड्या; पोलिसांनी सापळा रचून पकडले
गुटखा विक्री प्रकरणात एकाला अटक
गुटख्याची विक्री करणाऱ्यास खडक पोलिसांनी अटक केली आहे. मनीष कांतीलाल गेहलोत (वय २०, रा. डाके चौक, सुखसागरनगर, कात्रज ) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याबाबत पोलिस शिपाई आशिष चव्हाण यांनी खडक पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. शुक्रवार पेठेतील गाडीखाना चौकात दुकानासमोर गेहलोत गुटखा विक्रीसाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानूसार पोलिसांनी सापळा लावून त्याला पकडले.