हॉटेल व्यावसायिकाचा इटलीत अपघाती मृत्यू (संग्रहित फोटो)
नागपूर : शहरातील हॉटेल व्यावसायिक आणि गुलशन प्लाझाचे मालक जावेद अख्तर (वय ५७) आणि त्यांची पत्नी नादिरा अख्तर (वय ४६) यांचा इटलीमध्ये झालेल्या अपघातात मृत्यू झाला. हा अपघात इतका भीषण होता की, गाडीचा पूर्णपणे चक्काचूर झाला. गाडीत प्रवास करणारी त्यांची मोठी मुलगी, धाकटी मुलगी आणि मुलगा गंभीर जखमी इाले. ही बातमी नागपूरला पोहोचताच सर्वत्र शोककळा पसरली.
सूत्रांनी सांगितले की, अख्तर कुटुंब इटलीला सुट्टीसाठी गेले होते. इटलीतील एका ठिकाणी प्रवास करत असताना कार दुसऱ्या वाहनाला धडकली. धडक इतकी भीषण होती की, जावेद अख्तर आणि त्यांची पत्नी नादिरा अख्तर यांचा जागीच मृत्यू झाला. कुटुंबातील सदस्यांनी सांगितले की, मोठी मुलगी आरजू अख्तर (वय २४) ही गंभीर स्थितीत आहे. शिवाय धाकटी मुलगी शीफा अख्तर (वय २१) आणि मुलगा जाजेल अख्तर (वय १५) यांना किरकोळ दुखापत झाली असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मोठी मुलगी, आरजू एमबीएची विद्यार्थिनी आहे. तर धाकटी मुलगी दुसऱ्या वर्षाची बीएची विद्यार्थिनी आहे. मुलगा सध्या दहावीत आहे. वृत्तानुसार, मोठी मुलगी आरजू हिच्या मेंदूला दुखापत झाली होती आणि तिच्यावर रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली. कुटुंबातील सूत्रांनी सांगितले की, ते ज्या ठिकाणी गेले होते, ते त्यांचे शेवटचे पिकनिक स्पॉट होते. घटनास्थळाला भेट दिल्यानंतर ते शुक्रवारी इटलीहून भारतासाठी निघणार होते. परंतु संपूर्ण कुटुंब अपघातात सामील झाले. मुलांनी त्यांचे दोन्ही पालक गमावले.
हेदेखील वाचा : Delhi Crime: मुलाचं अपहरण करून ब्लॅकमेल, लग्न आणि शारीरिक संबध प्रस्थापित करण्यासाठी दबाव