दिल्ली: दिल्लीमधून एक धक्कदायक घटना घडल्याचे समोर आले आहे. मुलाचं अपहरण करून आरोपींनी पीडित महिलांवर शारीरिक संबंध प्रस्थापित करण्याचा दबाव आणल्याचा प्रक्रर समोर आला आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून गुन्हा दखल करण्यात आले आहे. पोलीस पुढील तपास करत आहे.
काय घडलं नेमकं?
ही घटना दिल्लीतील कृष्णा नगर पोलीस स्टेशन हद्दीतील असल्याची माहिती आहे. आरोपी आणि पीडित महिला हे दोन ते तीन महिन्यांपासून ओळखत असल्याचे महिलेने सांगितले. तसेच, आरोपीने पीडितेवर लग्न करण्यासाठी दबाव आणला असल्याचा गंभीर आरोप महिलेने केला. यावर पीडित महिलेने आरोपीला लग्न करण्यासाठी स्पष्ट नकार दिला. त्यानंतर, आरोपीने रागाच्या भरात महिलेच्या तीन वर्षांच्या मुलाला उपचारासाठी रुग्णालयात नेण्याच्या बहाण्याने बाहेर नेलं आणि त्याचं अपहरण केलं. या तक्रारीनंतर, पोलिसांनी तातडीने आरोपीचा शोध घेण्यास सुरूवात केली.
पोलिसांच्या तपासादरम्यान, आरोपी तरुण सूरत रेल्वे स्टेशनवर असल्याचं समोर आलं. त्यानंतर, दिल्ली पोलिसांनी स्थानिक रेल्वे पोलिसांना यासंबंधी माहिती दिली आणि त्यावेळी, रेल्वे पोलिसांनी आरोपीला अटक केल्याचं सांगण्यात येत आहे. यानंतर, आरोपीला पोलिसांनी लगेच दिल्लीला आणलं.
विद्यार्थिनीवर नृत्य शिक्षकाने केला वारंवार बलात्कार
दिल्लीतील जहांगीरपुरी येथील एका नृत्य अकादमीत एका शिक्षकाने बारावीच्या विद्यार्थिनीवर बलात्कार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पोलिसांनी १४ सप्टेंबर रोजी बलात्कार आणि पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आणि आरोपी नृत्य शिक्षक अमन याला अटक केली.
दिल्लीतील जहांगीरपुरी येथील एका नृत्य अकादमीत एका शिक्षकाने बारावीच्या विद्यार्थिनीवर बलात्कार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. १४ सप्टेंबर रोजी पोलिसांनी बलात्कार आणि पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आणि आरोपी नृत्य शिक्षक अमन याला अटक केली. पीडितेचे समुपदेशन सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, १७ वर्षीय पीडिता तिच्या कुटुंबासह भालसा डेअरी परिसरात राहते. अल्पवयीन मुलगी मॉडेल टाउनमधील एका खाजगी शाळेत १२ वीची विद्यार्थिनी आहे. पीडितेला नृत्याची आवड होती, म्हणून तिने गुगलवर शोधून जहांगीरपुरी ब्लॉकमधील एका नृत्य अकादमीचा पत्ता शोधला. मुलीच्या विनंतीवरून तिच्या कुटुंबाने तिला डान्स अकादमीमध्ये दाखल केले. पीडितेने सांगितले की, नृत्य शिक्षक अमनने तिला प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली. फेब्रुवारीमध्ये एके दिवशी अमनने तिला डान्स प्रशिक्षणासाठी अकादमीत बोलावल्याचा आरोप आहे. पीडिता आली तेव्हा तिथे कोणीही नव्हते. तिला एकटी पाहून अमनने तिच्यावर बलात्कार केला आणि जर तिने याबद्दल कोणाला सांगितले तर तिचे करिअर उद्ध्वस्त करण्याची धमकी दिली. असे असूनही, आरोपीने पीडितेवर आणखी तीन वेळा बलात्कार केला.
मुलीपासून दूर राहण्यासाठी तरुणाला वारंवार बजावले; नंतर संतापलेल्या बापाने चाकूने…