याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्पर्श नितीन कामे (वय 21, रा. कुमावतनगर, पूनम किराणाशेजारी, पंचवटी) हा युवक या हल्ल्यात गंभीर जखमी झाला आहे. याप्रकरणी तक्रारीनुसार, १२ डिसेंबर रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास मखमलाबाद रोडवरील महादेव कॉलोनीतील मनोहर अपार्टमेंट येथे मवर कुमावत यांचा हळदीचा कार्यक्रम सुरु होता. यावेळी अमोल कुमावत व स्पर्श कामे हे नाचत असतांना स्पर्शचा चंद्रभान गणपत चोथवे याला धक्का लागला. या किरकोळ कारणावरून दोघांत वाद निर्माण झाला.
तुम्हालाही बघून घेऊ…
वादात चंद्रभान चोथवे याने सुमित बोडके व इतर दोन साथीदारांना घटनास्थळी बोलावून घेतले. त्यानंतर सुमित बोडके याने “तुझा मर्डर करून टाकतो” अशी धमकी दिली. स्पर्श कामे याच्या डाव्या बाजूच्या बरगड्यांच्या खाली धारदार शस्त्राने वार केला. याहल्यात स्पर्श कामे हा गंभीर जखमी झाला. भांडण सोडविण्यासाठी अमोल कुमावत हा मध्ये पडला. आरोपींनी त्यांनाही शिवीगाळ करत “तुम्हालाही बघून घेऊ” अशी धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद आहे.
आरोपी अटकेत
घटनेनंतर जखमी स्पर्श कामे याला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी पंचवटी पोलिसांनी सुमित बोडके, चंद्रभान गणपत चोथवे (23, रा. क्रांतीनगर, तरसे चाळ, मखमलाबाद रोड) तसेच त्याच्या दोन साथीदाराविरोधात विविध कलमान्वये गुन्हा नोंदवला आहे. यातील चंद्रभान चोथवे याला अटक करण्यात आली आहे. आरोपीचा शोध सुरु आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
Ans: नाशिकच्या मखमलाबाद रोडवरील महादेव कॉलनीत.
Ans: 21 वर्षीय स्पर्श नितीन कामे.
Ans: चौघांविरोधात गुन्हा दाखल करून एकाला अटक केली.






