नाशिक शहर पुन्हा एकदा जाणार खड्यात...! मुख्य २९ रस्त्यांच्या बळकटीकरणाचे काम सुरू; सहा यंत्रणा खोदणार खड्डे (फोटो सौजन्य - Gemini)
प्रामुख्याने शरणपूर रोड (शरणपूर पोलिस चौकी ते जुना गंगापूर नाका), जुना गंगापूर नाका परिसर, कॅनडा कॉर्नर ते कॉलेज रोड, कॉलेज रोडवरील निवडक टप्पे, टिळकवाडी परिसरातील अंतर्गत रस्ते, मायको सर्कल चौक, जेहान सर्कल परिसर, महात्मानगर मुख्य रस्ता, एबीबी सिग्नल परिसर, पंपिंग स्टेशन रोड, सावतानगर लिंक रोड, परशुराम सायखेडकर नाका परिसर, गंगापूर रोडवरील सर्व रस्ते, गोल्फ क्लब परिसरातील रस्ता, विद्यानगर सावतानगर जोड रस्ता, नत्रश्या गणपती परिसरातील अंतर्गत मार्ग, अशोक स्तंभ परिसर, त्र्यंबक रोडवरील काही टप्पे, कॉलेज रोड गंगापूर रोड जोडणारे अंतर्गत रस्त्यांचा समावेश आहे. या रस्त्यांवर गंगापूर थेट पाईपलाईन, अमृत योजनेतील पाणी पुरवठा योजनेची कामेही केली जाणार आहेत. यासह अन्य काही रस्त्यांवर गॅस पाईपलाईन टाकण्यासाठी एमएनजीएलने सुमारे २९० किलो मीटरचे रस्ते खोदण्यासाठी मनपाकडे परवानगी मागितली आहे.
आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या दृष्टीने ही कामे महत्वाची असून, ती वेळेत पूर्ण करण्यासाठी यंत्रणांची धावपळ सुरू झाली आहे. एकाच वेळी सर्वच ठिकाणचे कामे हाती घेण्यात येणार असल्यामुळे नाशिककरांना रस्ते व त्यावरील खड़े चुकवितव मार्गक्रमण करावे लागणार आहे.
पावसाळा अजून पाच महिन्यावर असला तरी गेल्या वर्षावा अनुभव पाहता, मे महिन्यापासूनच अवकाळी पावसाने शहरात हजेरी लावून आपला मुक्काम चार महिने कायम ठेवला होता, शहरातील खड़े कायम असल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागला, त्यानंतर काही प्रमाणात महापालिकेने खड़े बुजविणे व काही नवीन रस्ते तयार केलेले असताना आता पुन्हा नव्याने संकट उभे ठाकले आहे. पावसाळ्यापूर्वी कामे न झाल्यास यंदाही खङ्ख्यांतून प्रवास करावा लागणार आहे.






