प्रकरण काय?
2012 मध्ये जालन्यातील इंदिरानगर परिसरात एका २ वर्षाच्या मुलीला चॉकलेटचे आमिष दाखवून रवीने मुलीचे अपहरण केले होते. त्यानंतर त्याने तिच्यावर बलात्कार करून हत्या केली होती. या घटनेने लोकांकडूनही तीव्र संताप व्यक्त केला जात होता. आरोपीना कठोर शिक्षा व्हावी म्हणून निदर्शनेही झाली होती. सत्र न्यायालयाने त्याला दोषी ठरवून १६ सप्टेंबर २०१५ रोजी फाशीची शिक्षा सुनावली होती.मुंबई उच्च न्यायालयाने जानेवारी २०१६ मध्ये त्याची फाशीची शिक्षा कायम ठेवली होती. आरोपीने सर्व मर्यादा ओलांडल्या अस म्हणत सर्वोच्च न्यायालयही संतापले होते. त्यानंतर त्याने राष्ट्रपतींकडे दया याचिका केली होती.आता देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनीही नोव्हेंबर २०२५ ला त्याची दया याचिका फेटाळली आहे.
चॉकलेटचं आमिष, अपहरण, बलात्कार अन् हत्या, १८ वर्षांनी उत्तरप्रदेशमधून आरोपी ताब्यात
वसई येथून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. २००७ साली एका चिमुकलीचा बलात्कार करून हत्या करण्यात आली होती. पोलिसांनी या गुन्ह्यातील फरार असलेला आरोपीला पोलिसांनी उत्तरप्रदेश येथून १८ वर्षानंतर अटक केली आहे. आरोपीचं नाव नंदलाल उर्फ नंदू विश्वकर्मा असे आहे.
काय घडलं होत?
वसई पूर्वच्या सातिवाली याभागात राहणाऱ्या बाबुला जगईप्रसाद गौतम हे राहत होते. याच परिसरात नराधम नंदलाल उर्फ नंदू विश्वकर्मा हा देखील राहत होता. एके दिवशी बाबुला जगईप्रसाद गौतम यांच्या चिमुकलीला चॉकलेटचे आमिष दाखवून अपहरण केले. त्यानंतर तिच्यावर बलात्कार केला आणि तिची निर्दयी मारहाण करून तिचा गळा आवळून हत्या केली.
या घटनेची फिर्याद ०१/०४/२००७ रोजी माणिकपूर पोलीस ठाण्यात देण्यात आली. पोलिसांनी भादवि कलम ३०२, ३६३, ३७६ गुन्हा दाखल केला. मात्र तेव्हापासून हा नराधम पोलिसांना गुंगारा देत फरार होता. मिरा भाईंदर, वसई विरार पोलीस आयुक्तालयातील पोलीस ठाण्यांच्या अधिकार क्षेत्रात घडलेल्या आणि अशा उघडकीस न आलेल्या खुनाच्या गुन्हयाचा समांतर तपास करुन गुन्हयाची उकल करण्याबाबत पोलीस आयुक्त निकेत कौशिक यांनी आदेश दिले होते.
Ans: रवी अशोक घुमरे
Ans: 6 मार्च 2012 रोजी.
Ans: दया याचिका फेटाळली; फाशीची शिक्षा कायम.






