नाशिक: फेसबुकवर व्यवसायाचे आमिष दाखवत लाखो रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचे समोर आले आहे. या प्रकरणात तणावात आणि नैराश्यात असलेल्या व्यक्तीने आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीचे नाव प्रशांत पाटील असेल आहे. याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी प्रशांत पाटील यांच्या पत्नी हर्षाली यांनी सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या पतीने फेसबुकवर https://www.facebook. com/padma.v.chikte या लिंकवरून संपर्कात आलेल्या व्यक्तीच्या सांगण्यावरून हापको ऑइलचा व्यवसाय सुरु करण्यासाठी पैसे गुंतवले होते. या संधार्बत संबंधिताने मेल आयडी padmavchikte@gmail.com व मोबाईल क्रमांक 9156097805 चा वापर केला आहे.
रक्कम विविध बँक खात्यांमध्ये केली जमा
प्रशांत पाटील आणि त्यांचे मित्र राजेश जीवन जाधव, हरिश्चंद्र पांडू भरसठ व मोहित संदीप एखंडे यांनी मिळून डिसेंबर 2023 ते 6 जून 2025 या दरम्यान कालावधीत एकूण ५५ लाख 79 हजार 300 रुपयांनी रक्कम विविध विविध बँक खात्यांमध्ये जमा केली. पैसे परत न मिळाल्याने आणि संपूर्ण रक्कम कर्जावर घेतल्याने आर्थिक तणावात आलेल्या प्रशांत पाटील यांनी आत्महत्या केली. यांनतर त्यांच्या पत्नीने सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.
समृद्धी महामार्गाच्या टोलनाक्यावर गोळीबार; एका कर्मचाऱ्याच्या थेट पोटात गोळी…..
छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यातील सावंगी येथील समृद्धी महामार्गाच्या टोलनाक्यावर दोन कर्मचाऱ्यांमध्ये झटापट झाली. यावेळी एकाने अचानक पिस्तूलमधून गोळीबार केला. या गोळीबारात एका कर्मचाऱ्याच्या थेट पोटात गोळी घुसली. गोळीबार झाल्यानंतर आरोपी हा फरार झाला. जखमी झालेल्या कर्मचाऱ्याला उपचारासाठी घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हा वाद का झाला याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही आहे.
नेमकं काय घडलं?
छत्रपती संभाजीनगर येथील फुलंब्री तालुक्यातील सावंगी येथील समृद्धी महामार्गाच्या टोलनाक्यावर शुक्रवारी रात्री गोळीबाराची एक घटना समोर आली आहे.
टोलनाक्यावर दोन कर्मचाऱ्यांमध्ये वाद झाला या वादात अचानक गोळीबार करण्यात आला. गोळीबारात एका कर्मचाऱ्याच्या थेट पोटात गोळी घुसली. आरोपीला तातडीने छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गोळीबारात जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव भारत घाटगे आहे.
प्राथमिक माहितीनुसार, भरात घाटगे आणि दुसरा कर्मचारी यांच्यात काही कारणावरून वाद झाला. वाद इतका टोकाला गेला की त्यामध्ये हाणामारी झाली.
या हाणामारी दरम्यान दुसऱ्या कर्मचाऱ्याकडून असलेल्या पिस्तूलमधून अचानक गोळी भरत घाटगे यांच्या दिशेने सुटली, आणि गोळी थेट त्यांच्या पोटात घुसली. गोळीबारानंतर आरोपी कर्मचारी घटनास्थळावरून फरार झाला. पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.
धक्कादायक ! पत्नीने पतीला फेकून मारलेले त्रिशूल चिमुकल्याच्या डोक्यात घुसले; तडफडून झाला मृत्यू