arrest (फोटो सौजन्य - pinterest)
५ लाख रुपये दे नाही तर तुझा खाजगी व्हिडीओ वायरल करेल, अशी धमकी एका भामट्याने एका डॉक्टरला दिली. पोलिसांनी भामट्याचा पर्दाफाश केला असून पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या आहेत. आरोपीवर १५ हुन अधिक गुन्हे दाखल आहेत. त्यामध्ये खंडणी, हल्ला, धमकी देणे आणि चोरी अशा गुन्ह्यांचा समावेश आहे. यापूर्वी त्याच्यावर अनेक वेळा प्रतिबंधात्मक कारवाई देखील करण्यात आली होती.
Air India Pee: भारतीयाकडून जपानी व्यक्तीवर लघुशंका, पुन्हा एकदा एअर इंडियातील विकृत प्रकार समोर
एका २६ वर्षाच्या डॉक्टरला तुझे खाजगी व्हिडीओ लीक करेन अशी धमकी एका ४३ वर्षाच्या भामट्याने दिली होती. त्या डॉक्टरने पोलिसांकडे धाव घेत तक्रार नोंदवल्यानंतर वडाळा टीटी पोलिसांनी त्या भामट्याला बेड्या ठोकल्या आहे. राजा वेणू नायर उर्फ केडी राजा असे आरोपीचे नाव आहे. आरोपीला तो व्हिडीओ कुठून मिळाला, तसेच त्या व्हिडीओची सत्यता पडताळण्यासाठी फॉरेन्सिक तपास केला जात आहे.
नेमकं काय प्रकरण?
पोलिसांच्या सांगण्यानुसार, पैसे उकळण्याची ही घटना साधारण महिन्याभरापूर्वी 6 मार्च रोजी घडली. तेव्हा आरोपी राजा वेणू नायकर उर्फ केडी राजा याने 26 वर्षांचा फिर्यादी डॉक्टरची भेट घेतली होती. आरोपी तेव्हा डॉ्कटरांच्या क्लिनिकमध्ये गेला आणि त्याने डॉक्टरला त्याच्या मोबाईलमधून एका खासगी फोटो दाखवला. त्यानंतर हा व्हिडिओ व्हायरल होऊ नये म्हणून आरोपीने डॉक्टरकडे 60 हजार रुपये मागितले. मात्र फिर्यादी डॉक्टर तेव्हा घाबरला, परिणाम काय होतील याची त्याला खूप काळजी वाटत होती. आपल्याकडे आत्ता तेवढे पैसे नाहीत असे सांगत डॉक्टरने आरोपीला जीपेवरून 1500 रुपये दिले.
मात्र आरोपी काही सुधारला नाही, त्याने डॉक्टरला ब्लॅकमेल करणे सुरूच ठेवले. काही दिवसांनी तो आरोपी पुन्हा डॉक्टरच्या क्लिनिक मध्ये आला आणि धमकी देऊन 5 लाख रुपये दे, अशी मागणी केली. अखेर तो डॉक्टर घाबरला, पण त्याने हिंमत गोळा केली आणि पोलिसांत धाव घेत याप्रकरणी तक्रार केली. त्याआधारे पोलिसांनी गुन्हा नोंदवत तपास केला आणि आरोपीला अटक करण्यात आली.