TERRORIST ATTACK (फोटो सौजन्य- PINTEREST)
काश्मीरमधील पहलगाम येथे काल दहशतवादी हल्ला झाला. टीआरएफ या दहशतवादी संघटनेने पर्यटकांच्या एका समूहावर हल्ला केला. दहशतवादी हे पोलीस गणवेश परिधान करून आले आणि आधी पर्यटकांची त्यांनी नावे विचारली. त्यांचे ओळखपत्रे तपासली त्यानंतर ते मुस्लिम नसल्याचे समजताच दहशतवाद्यांनी पर्यटकांवर अंदाधुंद गोळीबार केला. यात अनेक लोकांचा मृत्यू झाला आहे.
पहेलगाम हल्ल्यात मृत्यू झालेल्या पर्यटकांपैकी कर्नाटकातील शिवमोगा येथील मंजुनाथ यांचा हल्ल्यात मृत्यू झाला. त्यांची पत्नी पल्लवी यांच्या डोळ्यांसमोर त्यांना गोळ्या घालून ठार करण्यात आलं. मिळालेल्या माहितीनुसार, मंजुनाथ त्यांची पत्नी पल्लवी आणि त्यांच्या लहान मुलासह खोऱ्यात सुट्टीचा आनंद घालवण्यासाठी गेले होते. मंजुनाथ यांची पत्नी पल्लवी यांनी मृतदेह तातडीने विमानाने नेण्यात यावा अशी विनंती केली आहे.
हल्याआधीचा व्हिडीओ समोर
दरम्यान त्यांचा हल्याआधीचा व्हिडीओ समोर आला आहे. हल्याआधी मंजुनाथ त्यांची पत्नी पल्लवीसह बोटिंगचा आनंद घेतानाच व्हिडीओ समोर आला आहे आहे. तो व्हिडीओ सोशिअल मीडियावर वायरल होत आहे. या व्हिडिओत त्यांनी काश्मीर मध्ये काय काय केलं हे सांगत आहे.
व्हिडिओमध्ये काय?
मंजुनाथ आणि यांची पत्नी पल्लवी यांचा हल्याआधीचा व्हिडीओ वायरल झालं आहे. या व्हिडिओत ते सांगत आहेत की, “मी मंजुनाथ, कर्नाटकच्या शिवमोगा येथून आहे. आम्ही इंडियन ट्रॅव्हल्स टूरमधून बुकिंग करत काश्मीर फिरण्यासाठी आलो आहोत. आज आमचा काश्मीर टूरचा दुसरा दिवस आहे. काल आम्ही बोट हाऊसमध्ये थांबलो होतो. आता आम्ही शिकारा राईड करत आहे. मोहम्मद रफीक यांनी हे आयोजित केलं आहे. काजोल ठाकूरने ही सर्व टूर आयोजित केली आहे. खूप चांगली सर्व्हिस आहे”.
Manjunath was killed not because he was Kannadiga, not because he doesn’t know Hindi, but just because he’s a Hindu.!!! 🤬#Pahalgampic.twitter.com/kpTL5HcCis
— Chandra🚩 (@Chandra4Bharat) April 22, 2025
हल्ला झाला तेव्हा नेमकं काय झालं?
पल्लवी यांनी हल्ला झाला तेव्हा नेमकं काय झालं हे एका वृत्तवाहिनीशी संवाद साधतांना सांगितलं आहे. “आम्ही तिघे मी, माझा नवरा आणि आमचा मुलगा काश्मीरला गेलो होतो. दुपारी 1.30 च्या सुमारास हे घडलं. आम्ही पहलगाम येथे होतो. माझ्या डोळ्यांसमोर त्यांचा जागीच मृत्यू झाला. ते अजूनही वाईट स्वप्नासारखे वाटत आहे,” असं त्यांनी सांगितलं. हल्ल्यानंतर लगेचच स्थानिक नागरिक तिच्या मदतीला आले. तीन स्थानिक लोकांनी मला वाचवले असंही त्यांनी सांगितलं. हल्लेखोर हिंदूंना लक्ष्य करत असल्याचं दिसत होतं असंही त्यांनी सांगितलं. “तीन ते चार लोकांनी आमच्यावर हल्ला केला. मी त्यांना म्हटलं, मलाही मारून टाका, तुम्ही माझ्या नवऱ्याला आधीच मारले आहे. त्यापैकी एक म्हणाला, मी तुला मारणार नाही. हे मोदीला सांगा”.
त्यांनी अधिकाऱ्यांना पतीचा मृतदेह लवकरात लवकर शिवमोगा येथे परत नेण्यात यावा अशी विनंती केली आहे. “मृतदेह सहजासहजी खाली आणता येणार नाही. तो एअरलिफ्ट करायला हवा. तो ताबडतोब परत आणावा अशी आमची इच्छा आहे,” असं त्यांनी सांगितलं आहे.
A newlywed’s honeymoon turned into horror in #Pahalgam as terrorists shot her husband for not being Muslim. They asked his name, caste then killed him point-blank in kashmir. Her life shattered forever.#Kashmir #UPSC pic.twitter.com/4s1OYAdsiE
— Rebel_Warriors (@Rebel_Warriors) April 22, 2025