संग्रहित फोटो
मंगळवारी (१८ नोव्हेंबर) दुपारी ३ वाजताच्या सुमारास परंडा नगरपालिकेत नामनिर्देशन पत्र छाननीच्या ठिकाणी व कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावर आचारसंहितेचे उल्लघन करुन निवडणुक कामकाजावेळी गोंधळ निर्माण करुन दगडफेक करुन शासकीय मालमत्तेस, स्वत:चे व इतरांचे जिवीतास धोका निर्माण केला व जिल्हाधिकारी यांचे आदेशाचे उल्लघंन केले. आशा आशयाची तक्रार नगर अभियंता राहुल बंडु रणदिवे यांनी बुधवारी (१९ नोव्हेंबर) परंडा पोलिसात दिली आहे. त्यावरून गुन्हा नोंदवला आहे.
गुन्हा नोंद झालेल्यांची नावे
जाकीर ईस्माईल सौदागर, कैफ आब्दुल सौदागर, मोसीन जाकीर सौदागर, उबेद वाहेद आत्तार, रहिमान सौदागर, औरब वाहेद सौदागर, फाजील ईस्माईल सौदागर, गबु ईस्माईल सौदागर, वाहेद ईस्माईल सौदागर, सोनु आत्तार रहिमान सौदागर शर्फराज महंमद शरिफ कुरेशी, शेरु ईस्माईल सौदागर, नसीम अहमद पठाण, शफी अहमद पठाण, इरफान जब्बार शेख, मुनाफ सौदागर, ईफु निसार सौदागर, नुतलिब आब्दुल सत्तार कुरेशी, ईस्माईल सत्तार कुरेशी, मोसीन दस्तगीर कुरेशी, सम्मद अब्दुल सत्तार कुरेशी, रफीक कुरेशी, ईरशाद आलीशान कुरेशी, बिलाल खुद्रुस कुरेशी, अलिशान कुरेशी (सर्व रा. परंडा ता. परंडा जि. धाराशिव).
छाननीवेळी झालेल्या बाचाबाचीतून उडाला गोंधळ
मंगळवारी उमेदवारी छाननीदिवशी तीन अपत्य असल्याची हरकत जाकेर सौदागर यांनी प्रभाग तीनमधील अन्य उमेदवाराच्या अर्जावर घेतली होती. मात्र निवडणूक निर्णय अधिकाऱ्याने ही हरकत फेटाळून लावली. त्यावर विरोधकांनी टाळ्यांचा गजर केला. यानंतर सभागृहाबाहेर येताच दोन गटात शाब्दिक बाचाबाची झाली. त्याचे पर्यवसान दगडफेकीत झाले. परंडा शहरात तणाव वाढला होता. मात्र पोलीस आणि प्रशासनाने यावर नियंत्रण मिळवत परिस्थिती सामान्य केली.






