पुणे जिल्ह्यातील दौडं तालुक्यात अंगावर काटा आणणारी घटना घडली आहे . स्वतःच्या आईचे एका व्यक्तीसोबत अनैतिक संबंध आहेत . याचा संशय हा अनेक दिवसांपासून मुलाला होता. मात्र या रागातूनच मुलाने आई सोबत संबंध ठेवलेल्या व्यक्तीचा रागातून खून केल्याची घटना घडली आहे .
दौंड तालुक्यातील इंदिरानगर इथ १४ ऑगस्ट ला रात्री पावणे बारा वाजता जब्बार शेख यांच्या घरासमोर मुलाने प्रवीण पवार या व्यक्तीवर हल्ला केला आणि या हल्ल्यात त्याचा जागीच मृत्यू झाला आहे . विशाल उर्फ नल्या किसन थोरात अस आरोपीच नाव आहे . कोयत्याने सपसप वार करत जागीच त्याने खून केला . या हल्ल्याने इंदिरानगर परिसरात भीतीच वातावरण पसरलं होत .प्रवीण पवार याच्या तोंडावर आणि हातावर गंभीर जखमा होत्या . कोयत्याने वार केल्याने तो या हल्ल्यात वाचू शकला नाही .
या घटनेची तक्रार नितीन गुप्ते यांनी दौड पोलीस ठाण्यात दिली आहे . भारतीय न्याय संहितेच्या कलम १०३ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे . मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे पोलिस पुढील तपास करत आहेत .
का केला खून
या घटनेने पुणे जिल्ह्यातील पुन्हा गुन्हेगारीच वास्तव समोर आल आहे . प्रवीण पवार याचे खरच संबंध होते का ? किवा कोणत्या कारणातून हत्या झाली याचा तपास पोलीस करत आहेत.
पुण्यात चोरांचा धुमाकूळ! ‘या’ भागात घरे फोडून लाखो रुपयांवर मारला डल्ला
पुणे शहरात घरफोड्यांचे सत्र कायम असून, चोरटे दररोज राज्यासह देशातील वेगवेगळ्या भागात बंद घरांना टार्गेट करुन लाखो रुपयांवर डल्ला मारत आहेत. अशातच आता पुण्यातून चोरीसंदर्भात एक मोठी बातमी समोर आली आहे. सिंहगड रोड भागातील गणेशमळा परिसरात तसेच कोंढवा बिबवेवाडी रोडवरील सोसायटीत झालेल्या घरफोडीत चोरट्यांनी ११ लाख रुपयांचा ऐवज लांबविल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी चोरट्यांवर पर्वती आणि कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी पर्वती पोलिस ठाण्यात २९ वर्षीय महिलेने तक्रार दिली आहे. त्यानूसार, अज्ञात चोरट्यांविरूद्ध गुन्हा नोंद केला आहे. तक्रारदार या गणेशमळा भागातील ओैंदुबर सोसायटीत राहतात. त्या कुटूंबियासह घराला कुलूप लावून बाहेर गेले होते. तेव्हा चोरट्यांनी कुलूप तोडून आत प्रवेश केला. तसेच, ८ लाख ६५ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने लांबविले. नुकताच हा प्रकार समोर आला आहे. अधिक तपास उपनिरीक्षक किरण पवार करतात.
तसेच, बिबवेवाडी-कोंढवा रस्त्यावरील मोरयानगरी सोसायटीत राहणाऱ्या एका महिलेचा फ्लॅट फोडत चोरट्यांनी कुलूप तोडून आत प्रवेश केला. तर, बेडरूममध्ये घुसत कपाटातील सोन्याचे दागिने लांबविले. याबाबत एका महिलेने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला आणि कुटुंबीय सोमवारी (११ ऑगस्ट) सकाळी सदनिका बंद करून बाहेर गेले होते. चोरट्यांनी सदनिकेचे कुलूप तोडून कपाटातील दोन लाख २८ हजारांचे सोन्याचे दागिने लांबविले. पोलीस हवालदार मेमाणे तपास करत आहेत.
बिनधास्त बेकायदा पिस्तुल घेऊन फिरणाऱ्या चौघांना ठोकल्या बेड्या; पोलिसांची वाघोलीत मोठी कारवाई