मुंबई: मुंबईतील जे जे रुग्णालयातून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. उपचारासाठी आणलेल्या एका महिला आरोपीने गर्दीचा फायदा घेत रुग्णालयातून पलायन केल्याचे समोर आले आहे. पसार झालेल्या आरोपीचे नाव रुबाना शेख असे आहे. ती फसवणुकीच्या गुन्ह्यात अटकेत होती.
आरोपी रुबाना शेख हिच्यावर यापूर्वी फसवणुकीचा गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात तिला अटक करून भायखळा येथील महिला कारागृहात ठेवण्यात आले होते. रुबाना ही सुमारे पाच महिन्यांची गरोदर आहे. कारागृहात असताना तिला थंडी, ताप व त्वचेचे आजार जडले होते. त्यामुळे तिला अधिक चांगल्या वैद्यकीय उपचारासाठी भायखळा कारागृहातून मुंबईतील जे जे रुग्णालयात हलविण्यात आले होते.
शोध सुरु
जे जे रुग्णालयातून उपचारासाठी आणलेल्या रूबानाने गर्दीचा फायदा घेत पोलिसांच्या देखरेखीखालून पलायन केले. ही घटना लक्षात येताच पोलिसांनी तत्काळ परिसरात शोध सुरू केला.
पोलीस वर्तुळात खळबळ
या प्रकरणी जे जे मार्ग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांकडून महिला आरोपीचा शोध घेतला जात आहे. सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत. मात्र, महिलेने अचानक पलायन केल्याने पोलीस वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
लॉकअपचे गज कापून पाच वर्षांपूर्वी पाळलेल्या हत्येच्या गुन्ह्यातील आरोपींना अखेर पुण्यातून अटक
कर्जत स्टेशनच्या लॉकअपचे गज कापून पाच वर्षांपूर्वी पळालेल्या खुनाच्या गुन्ह्यातील दोन आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी बुधवारी (दि. 13) अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे अक्षय राऊत आणि चंद्रकांत राऊत असे आहे. या दोन्ही आरोपींना २०१८साली हसन उमर शेख यांच्या खुनाच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली होती. परंतु ते लॉकअपचे गज कापून पळाले होते.
नेमकं काय प्रकरण?
याबाबत अधिकची माहिती अशी की, २०१८ साली जुलैमहिन्यात टरबूज व्यापारी हसन उमर शेख (50, रा.मुंबई) यांची मोहन कुंडलिक भोरे व त्याच्या चार साथीदारांनी हत्या केली. या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडीत असलेले अक्षय रामदास राऊत (28), चंद्रकांत महादेव राऊत (30, दोन्ही रा. पारवाडी, ता. जामखेड, जि. अहिल्यानगर) व त्यांचे 3 साथीदार अशा पाच आरोपींनी १० फेब्रुवारी २०२० रोजी कर्जत पोलीस स्टेशनच्या लोकउपचा छताचे लोखंडी गज तोडून, छतावरील कौले काढून पळाले होते.
याच गुन्ह्यातील आरोपी ज्ञानेश्वर तुकाराम कोल्हे, मोहन पुंडलिक भोरे, गंगाधर लक्ष्मण जगताप यांना अटक करण्यात आली होती. उर्वरीत आरोपी अक्षय रामदास राऊत, चंद्रकांत महादेव राऊत पसार झाले होते. पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी पोलीस स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांना पसार आरोपींचा शोध घेण्याचे आदेश दिले होते.
त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अंमलदार हृदय घोडके, बाळासाहेब नागरगोजे, सागर ससाणे, रोहित येमुल, प्रशांत राठोड, अरुण मोरे यांच्या विशेष पथकाने बुधवारी (दि.13) मिळालेल्या माहितीनुसार आरोपींचा शोध घेत अक्षय राऊत, चंद्रकांत राऊत यांना पुणे जिल्ह्यातील फुलगाव एमआयडीसी येथून ताब्यात घेतले. दोघांना कर्जत पोलीस स्टेशनमध्ये हजर करण्यात आले आहे. या प्रकरणी अधिक तपास कर्जत पोलीस करीत आहेत.
Investment Fraud : जादा परताव्याच्या आमिषाने दोघांची फसवणूक; लाखो रुपयांना घातला गंडा