संग्रहित फोटो
कांबळे याच्यावर त्याच्या पत्नीने कौटुंबिक छळाची तक्रार काळेपडळ पोलिस ठाण्यात दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी कांबळे आणि एका महिलेविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. कांबळे याने केलेल्या वर्तनामुळे शिस्तबद्ध असलेल्या पोलिस खात्याची प्रतिमा मलीन झाल्याचा ठपका ठेवत त्याला पोलिस खात्यातून निलंबीत करण्यात आले आहे.
कांबळे याच्या पत्नीने दिलेल्या तक्रारीनुसार, पोलिस हवालदार हनुमंत कांबळे याने एका महिलेसोबत संगणमत करून, त्यांच्या दोघांचे अनैतिक संबंध लपवून ठेवले. पतीने पोलिस असल्याचे व वर्दीचा धाक दाखवून वेळोवेळी अंगावर धावून जात तक्रारदारांना शिवीगाळ करून हाताने मारहाण केली. तसेच घरातून हाकलून देण्याबरोबरच घटस्फोट देण्याची धमकी देऊन त्यांचा शारिरीक व मानसिक छळ केला. तसेच आरोपी महिलेने देखील तक्रारदारांना शिवीगाळ करून हाताने मारहाण केली.
तक्रारदारांचा पती अनेकदा त्यांच्यासोबत खोटे बोलत होता. तक्रारदारांनी पतीला आणि महिलेला अनेकदा पकडले होते. १५ जून २०२६ रोजी तक्रारदारांनी पती कांबळे याला रात्री फोन केल्यावर त्याने कोम्बींगची ड्युटी असल्याचे सांगितले. प्रत्यक्षात तो पिंपरी चिंचवड येथील सी डॉक या पबमध्ये त्या महिलेसोबत दारु पित बसला होता. पत्नीने तेथे जाऊन जाब विचारल्यावर मी पोलिस आहे. माझे काही होणार नाही, तु काही करु शकत नाही, असे बोलला. दरम्यान, सतत होणाऱ्या त्रासाला कंटाळून अखेर तक्रारदारांनी पोलिस ठाण्यात धाव घेत पती आणि महिलेविरुद्ध तक्रार दिली आहे.
हे सुद्धा वाचा : नसरापूर अत्याचारप्रकरणी मोठी अपडेट; वैद्यकीय अहवालातून धक्कादायक माहिती समोर






