सुसुईड नोटमध्ये काय?
अमर सिंग चहल यांनी पंजाबचे डीजीपी गौरव यादव यांना उद्देशून पत्र लिहिले. त्यांना व्हॉट्सॲप आणि टेलिग्रामवरील एका बनावट गुंतवणूक ग्रुपद्वारे शेअर बाजारात मोठ्या परताव्याचे आमिष दाखवण्यात आले होते. या फसवणुकीत त्यांनी स्वतःचे 1 कोटी आणि नातेवाईक व मित्रांकडून उसने घेतलेले सुमारे 7 कोटी रुपये गमावले. सायबर ठगांनी त्यांना बनावट ‘डॅशबोर्ड’ दाखवून नफा होत असल्याचे भासवले. मात्र, जेव्हा त्यांनी पैसे काढण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्यांना ‘सर्व्हिस फी’ आणि ‘टॅक्स’च्या नावाखाली अधिक पैसे भरण्यास भाग पाडले गेले. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी विशेष पथक (SIT) स्थापन करण्याची मागणी चहल यांनी आपल्या चिठ्ठीत केली आहे असे त्यांनी पत्रात लिहिले आहे.
याच सगळ्या तणावातून अमर सिंग चहल यांनी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. कुटुंबियांना माहिती होताच कुटुंबीयांनी तातडीने पटियाला येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या फुफ्फुसाजवळ अडकलेली गोळी शस्त्रक्रियेद्वारे बाहेर काढण्यात आली आहे. मात्र, मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्यामुळे त्यांची प्रकृती अजूनही अत्यंत चिंताजनक आहे.
अमर सिंग चहल फरीदकोट गोळीबार प्रकरणातील आरोपी
अमर सिंग चहल हे 2015 मधील बहुचर्चित फरीदकोट गोळीबार प्रकरणातील (बेहबल कलान आणि कोटकपुरा) आरोपी आहेत. 2023 मध्ये पंजाब पोलिसांच्या विशेष तपास पथकाने (SIT) या प्रकरणात माजी मुख्यमंत्री प्रकाश सिंह बादल आणि सुखबीर सिंह बादल यांच्यासह चहल यांच्याविरुद्ध आरोपपत्र दाखल केले होते.
धक्कादायक ! पोलिसांसमोरच कापला स्वतःचा गळा; धारदार शस्त्र हाती घेतलं अन् नंतर…
Ans: ऑनलाइन गुंतवणूक स्कॅममध्ये 8.10 कोटी रुपये गमावल्याच्या तणावामुळे.
Ans: बनावट डॅशबोर्ड, मोठ्या नफ्याचं आमिष आणि टॅक्स-फीच्या नावाखाली पैसे उकळले.
Ans: गोळी शस्त्रक्रियेद्वारे काढण्यात आली असून प्रकृती अत्यंत गंभीर आहे.






