समाधान मुंडेचा तरुणावर हल्ला, सोशल मीडियावर धमकीचे ऑडिओ व्हायरल
Beed Crime News: परळी येथे शुक्रवारी संध्याकाळी शिवराज दिवटे या तरुणाचे अपहरण करून त्याच्यावर मारहाण करण्यात आली. या हल्ल्यात शिवराज दिवटे जखमी झाला असून, या प्रकरणात बीड पोलिसांनी समाधान मुंडेसह काही आरोपींना ताब्यात घेतले आहे. शिवराज दिवटे याच्यावर समाधान मुंडे आणि त्याच्या साथीदारांनी हल्ला केला. या टोळक्यात १८ वर्षांखालील अनेक तरुणांचा समावेश असल्याचे उघड झाले असून, त्यामुळे समाजात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. परळी आणि बीड जिल्ह्यात अल्पवयीन मुलांमध्ये गुन्हेगारी प्रवृत्ती आणि ‘भाईगिरी’ची वाढती मानसिकता किती गंभीर आहे, हे या प्रकरणातून स्पष्ट होते. (या ऑडिओ क्लिपची नवराष्ट्र पुष्टी करत नाही)
दरम्यान, शिवराज दिवटे याला मारहाण करणाऱ्या समाधान मुंडेची एक ऑडिओ क्लिप सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या क्लिपमध्ये तो सुहास साबळे या तरुणाला धमकावताना ऐकायला मिळतो. समाधान मुंडे म्हणतो, “तू माझ्या भावाला, रोहित मुंडेलाही एकदा चुकीचं बोलला होतास. आता पुन्हा काही चुकीचे बोललास, तर परिणाम गंभीर होतील. तीन शब्द रॉंग गेले तर कोयत्याने हल्ला करीन,” अशा प्रकारची धमकी या क्लिपमध्ये ऐकायला मिळते.
Earthquake : मध्यरात्री ‘या’ ठिकाणी हादरली जमीन, जाणवले जोरदार भूकंपाचे धक्के
परळी येथे काल समाधान मुंडे आणि त्याच्या १० ते १२ साथीदारांनी शिवराज दिवटे या तरुणाचे अपहरण करून त्याला रत्नेश्वर मंदिर परिसरात नेले आणि तेथे लाठ्या, काठ्या व बेल्टने अमानुष मारहाण केली. या हल्ल्यात शिवराज गंभीर जखमी झाला. या घटनेपूर्वी शिवराज दिवटेने सुरेश साबळे आणि भागवत साबळे यांना परळी शहरात समाधान मुंडे आणि तुकाराम गिरी यांच्या मारहाणीतून वाचवले होते. या हल्ल्यात भागवत साबळे यांना कत्ती लागली होती. याप्रकरणी अदखलपात्र स्वरूपाचा गुन्हा देखील नोंदवण्यात आला होता. या प्रकरणातील मुख्य आरोपी समाधान मुंडे याने आणखी एक तरुण, सुहास साबळे याला फोनवरून कोयत्याने मारण्याची धमकी दिली असल्याची माहिती समोर आली आहे.
Thackeray-MNS Alliance: उद्धव ठाकरे-राज ठाकरे युती होणार…! आदित्य ठाकरेंचे सूचक संकेत
समाधान मुंडे याचे दोन ऑडिओ क्लिप्स सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. यापैकी एका क्लिपमध्ये तो एका व्यक्तीला म्हणताना ऐकायला मिळते की, “सुहास साबळेला मी त्याच्या घरी घुसून मारणार. त्याच्या गल्लीतून मी स्वतः त्याची दिंडी काढणार. मी म्हणजे आमची १५-२० पोरं आहेत. ज्या दिवशी परत येईन, त्यादिवशी दिंडी काढणार. फक्त तू मध्ये पडू नको, आपले चांगले संबंध आहेत. मी तुझ्या चौकात पाच वाजता येईन.”