सौजन्य : iStock (Sandal Tree)
संभाजीनगर : मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठाची कडेकोट सुरक्षा भेदून चक्क न्यायमूर्तींच्या बंगल्याच्या परिसरातून चोरट्यांनी दोन चंदनाची झाडे चोरून नेल्याचा गंभीर प्रकार उघड झाला. गुन्हे शाखेने तिघांना अटक केली. शहरातून सुभेदारी विश्रामगृह, जिल्हाधिकारी, कुलगुरू, मनपा आयुक्त, पोलिस आयुक्त परिसर व निवासस्थानातून यापूर्वी चंदनाच्या झाडांची चोरी झालेली आहे.
हेदेखील वाचा : ‘लाडक्या बहिणीं’साठी राबणाऱ्यांचे हात रिकामेच; अर्ज भरण्याचे मिळणार होते प्रतिअर्ज 50 रुपये पण…
आता चोरांनी 24 तास खडा पहारा असलेली हायकोर्ट सुरक्षा भेदून चंदन झाडाची चोरी केल्याची घटना उघड झाली आहे. खंडपीठाच्या अगदी खेटूनच न्यायमूर्ती यांचा बंगला आहे. या संपूर्ण परिसराला 24 तास पोलिसांचा खडा पहारा आहे.
पोलिसांनी तपास करून केलं तिघांना अटक
15 नोव्हेंबर 2024 रोजी पहाटे साडेतीनच्या सुमारास बंगला क्र. 8 च्या कंपाउंडलगत दोन चंदनाची झाडे बुंध्यापासून तोडून नेण्यात आली. यावेळी पक्ष्यांचा आवाज आल्याने ड्युटीवर असलेले पोलिस कर्मचारी त्रिंबक हरिभाऊ करडेल यांनी बंगला क्र. ७ जवळील पोलिस चौकीतील सहकारी जफर इब्राहिम शहा यांना सोबत घेऊन पाहणी केली. त्यावेळी त्यांना कुणीतरी पळून जातानाची चाहूल लागली.
नंतर पाहणी केली असता, दोन झाडे चोरट्यांनी तोडून पळवल्याचे लक्षात आले. दोन्ही कर्मचाऱ्यांनी हायकोर्ट सुरक्षा अधिकारी सिद्धीकी यांना माहिती दिली. चोरीचा प्रकार लक्षात आल्याने सदर पोलिस कर्मचाऱ्यांनी परिसरातील झाडांची पाहणी केली. त्यावेळी कंपाउंडमधील झाडही कापण्याचा 15 प्रयत्न झाल्याचे निदर्शनास आले.
सीसीटीव्हीद्वारे लावला शोध; तिघांना केली अटक
गुन्हे शाखेचे निरीक्षकांच्या नेतृत्वाखालील पथकाने सीसीटीव्ही आणि खबऱ्यांच्या माध्यमाने माहिती काढून संशयित आरोपी हारुण खान मजीद खान (वय २२, रा. गल्ली नं. १०, मिसारवाडी), फहीम खान फारुख खान पठाण (वय २२), जुबेर खान नबी खान पठाण (वय २२, रा. दोघे कठोरा बाजार, ता. भोकरदन) या तिघांना एक डिसेंबर रोजी सकाळी पोलिसांनी अटक केली. या तिघांना सात दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले होते. पोलिसांनी त्यांना पुन्हा न्यायालयात हजर केले होते.
हेदेखील वाचा : मंत्रिपदासाठी इच्छुकांचा मुंबई मुक्काम लांबला; यवतमाळचे सातही आमदार अधिवेशनासाठी मुंबईत