गोरेगावमध्ये तरुणीची आत्महत्या (File Photo : Suicide)
नागपूर : गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. त्यात नागपूर महापालिकेच्या आशीनगर झोनमधील सफाई कर्मचारी राजू उपाध्ये (वय ५७) यांनी बुधवारी दुपारी जागृतीनगरातील राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली. राजू उपाध्ये याने आशीनगर झोनमधील अधिकारी त्रास देत असल्याने पाऊल उचलल्याचे कथित सुसाईड नोटमध्ये नमूद करण्यात आले. त्यामुळे महापालिकेत खळबळ उडाली आहे.
राजू उपाध्ये या कर्मचाऱ्याच्या आत्महत्येने आशीनगर झोनमधील अधिकाऱ्यांची झोप उडाली आहे. पुतणे शुभम उपाध्ये यांनी याबाबत जरिपटका पोलिसांना माहिती दिली असून, चौकशीची मागणी केली आहे. पुतणे शुभम उपाध्ये यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, राजू उपाध्ये यांच्या पायावर सिवेज लाईन चेंबरवरील झाकण पडले होते. त्यामुळे ते कामावर गैरहजर होते. त्यांनी आशीनगर झोनमधील अधिकाऱ्यांकडे सुटीचा अर्जही दाखल केला होता. ते नेहमीच कामावर त्यांच्याशी भेदभाव केला जात असल्याचे घरी बोलत असल्याचेही पोलिसांना दिलेल्या लेखी तक्रारीत नमूद केले आहे.
हेदेखील वाचा : Nagpur news: ट्रस्टच्या नावावर बनावट बिले; विकासकामांचा निधी लाटला; मनसेचे गंभीर आरोप
दरम्यान, बुधवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास राजू उपाध्ये घरी आले. ते थेट वरच्या मजल्यावरील त्यांच्या खोलीत गेले. त्यानंतर त्यांनी गळफास घेतला. त्यावेळी चुलत भाऊ सौरभ घरी असल्याने त्यांना गळफास घेतलेल्या स्थितीतून काढून खाजगी रुग्णालयात नेले. परंतु, डॉक्टरांनी मेयो रुग्णालयात घेऊन जाण्याचा सल्ला दिला. त्यानुसार, राजू उपाध्ये यांना मेयोत नेले असता तेथील डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
सुसाईड नोट पोलिसांना मिळाली अन्…
यावेळी राजू उपाध्ये यांची स्वाक्षरी असलेली कथित सुसाईड नोटही मिळाली असून, ती व्हायरल करण्यात आली. यात उपाध्ये यांनी काही अधिकाऱ्यांची नावे घेत नेहमी ‘टार्गेट’ करत असल्याचे म्हटले आहे. इतरांची कामेही माझ्यावर ढकलली जात होती, असेही त्यांनी काही सहकाऱ्यांची नावे घेत म्हटले आहे. या सुसाईड नोटची पोलिसांकडून चौकशी करण्यात येत आहे.
महानगरपालिकेत अनेकांना कामाचे टेन्शन
तोकड्या मनुष्यबळामुळे अतिरिक्त प्रभार, त्यात राज्य सरकारच्या विविध योजनाच्या कामामुळे महापालिकेतील अधिकारी त्रस्त झाले असून, त्यांच्या मानसिकतेवर व आरोग्यावरही परिणाम होत असल्याचे या घटनेने पुढे आले आहे.
हेदेखील वाचा : तरुणीला रस्त्यात गाठत तरुणाने केली I Love Youची मागणी; तरुणीने नकार दिला आणि नंतर जे घडलं ते थरारक