राजस्थानमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एकतर्फी प्रेम प्रकरणातून तरुणाने तरुणीला रस्त्यात गाठले. तिला I Love You म्हण असे धमकावले. तरुणी हे बघून एकदम घाबरली. तरुणीने I Love You बोलण्यास थेट नकार दिला. तिने मुलाला चांगलेच सुनावले. मात्र तरुणाला या गोष्टीचा राग होताच. तरुणाने राग मनात ठेवून असे काही केले की ते थरकाप उडवणार होत.
नेमकं काय प्रकरण?
ही घटना राजस्थानमधील झुंझुनू जिल्ह्यात घडली आहे. २२ वर्षीय तरुणीसोबत ही घटना घडली आहे. तिच्या कुटुंबीयांनी सांगितले की, घराशेजारी राहणार प्रमोद हा मुलीवर मुलीवर मैत्री करण्यासाठी अनेक दिवसांपासून दबाव टाकत होता. तिला त्याने अनेकदा रस्त्यात गाठत आय लव्ह यू म्हण अशी गळ घातली होती. त्यादिवशी त्याने पुन्हा तेच कृत्य केले. तिला रस्त्यात गाठले. त्याने पुन्हा आय लव्ह यू साठी दबाव टाकला. त्यावेळी चिडलेल्या मुलीने त्याला चांगलेच सुनावले. तिने असे करण्यास नकार दिला. मग तरुण त्या ठिकाणावरून निघून गेला. पण त्याच्या मनात राग कायम होता.
५ ऑगस्टला तरुणी एकटीच घरात असल्याचे त्याने पाहिले. तिची आई दुसऱ्या गावाला गेली होती आणि तिचे वडील हे शेतात काम करत होते. हे बघून त्याने संधी साधली आणि थेट घरात घुसला. प्रमोदने पुन्हा तिला आय लव्ह यू म्हणण्याचा हट्ट धरला. तो तिच्याशी लगट करण्याचा प्रयत्न करू लागला. मग तरुणीने आरडाओरड केली. घाबरून प्रमोद तिथून पळाला.
काहीवेळाने तरुणी ही शेताकडे गेली. तिथे तिने गुरांना चारापाणी केले. आरोपी तिच्या मागावराच होता. त्याने तिला पुन्हा रस्त्यात गाठले. आय लव्ह यू म्हणण्याची जिद्द केली. तरुणीचाही पारा चढला. पण प्रमोदच्या मनात राग होता. त्याने तरुणीच्या मानेवर, डोक्यात, खांद्यावर, पोटात, पाठीत आणि हातावर चाकूचे सपासप वार केले.
तरुणीने यानंतर आरडाओरडा केला. आरडाओरडा केल्याने शेतात काम करणारे लोक धावले. लोक मारायला येत असल्याचे पाहताच आरोपीने स्वतःवर पण चाकूने वार केले आणि सोबत आणलेले विष पिले. तरुणीची आणि प्रमोद सध्या धोक्याबाहेर आहेत. दोघेही नात्यात आहेत. दोघांचे घर आणि शेत जवळ आहेत. या दोन्ही कुटुंबात कधीच वाद झाला नाही. या घटनेने दोन्ही कुटुंबांना धक्का बसला आहे.