अपत्यप्राप्तीच्या नावावर दाम्पत्यास गंडा (File Photo : Fraud)
लाखनी : तालुक्यातील पिंपळगाव (सडक) येथे पोलिस असल्याची बतावणी करून तीन व्यक्तींनी ज्येष्ठ नागरिक अंकुश गणपत फुले (वय 70) यांची 45 हजार रुपये किमतीची 6 ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी लंपास केल्याची घटना मंगळवारी (दि. 22) सकाळी साडेनऊच्या सुमारास घडली. लाखनी पोलिसांनी याप्रकरणी तीन व्यक्तींविरुद्ध गुन्हा नोंदवून तपास सुरू केला.
अंकुश फुले हे मंगळवारी सकाळी रस्त्याने एकटे पायी जात असताना एका वाहनाने आलेल्या एका व्यक्तीने त्यांना थांबवले. दरम्यान, स्वतः पोलिस असल्याचे सांगत ओळखपत्र दाखवले आणि लगेच ते खिशात ठेवले. त्यानंतर त्या व्यक्तीने फुले यांना धमकावत, “तुझ्याकडील सोन्याची अंगठी किंवा इतर मौल्यवान वस्तू असतील तर काढून ठेव,” असे सांगितले. याचवेळी आणखी दोन अज्ञात व्यक्ती एका गाडीतून तिथे आल्या. भयभीत झालेल्या फुले यांनी आपल्या हातातील 6 ग्रॅम वजनाची, अंदाजे 45 हजार रुपये किमतीची सोन्याची अंगठी काढून त्या व्यक्तीला दिली. त्या व्यक्तीने अंगठी घेऊन ती कागदात गुंडाळली आणि फुले यांच्या हातात परत दिली. त्यानंतर तिघेही जण तिथून पळून गेले.
हेदेखील वाचा : Maharashtra News: “बांधकाम कामगारांची फसवणूक करणाऱ्यांवर…”; कामगार मंत्री फुंडकरांचा थेट इशारा
फुले यांनी कागद उघडून पाहिल्यावर त्यात सोन्याची अंगठी नसून बनावट अंगठी आढळली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी लाखनी पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली. लाखनी पोलिसांनी गुन्हा नोंदवला असून पोलिस उपनिरीक्षक देविदास बागडे यांच्या नेतृत्वाखाली तपास सुरू आहे. अज्ञात तिघांच्या शोधासाठी पोलिसांनी पथके रवाना केली असून मोटरसायकल क्रमांकाच्या आधारे संशयितांचा माग काढला जात आहे.
फसवणूक करत 66 लाखांना गंडा
दुसऱ्या एका घटनेत, पुण्यातली मुकुंदनगर तसेच बिबवेवाडीतील दोन तरुणांना सायबर चोरट्यांनी शेअर ट्रेडिंगमधील गुंतवणूकीवर चांगला परतावा देण्याच्या आमिषाने तब्बल ६६ लाख रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. पोलिसांकडून वारंवार आमिषाला बळी न पडण्याचे आवाहन केले जात असताना शेअर ट्रेडिंगच्या बहाण्याने फसवणूक करण्याच्या घटना सातत्याने घडत असल्याचे दिसत आहे.