महावितरणच्या अभियंत्याला मारहाण करणं भोवलं; कोर्टाने सुनावली 'ही' शिक्षा (File Photo : Court)
भंडारा : थोरल्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अतिरिक्त व जिल्हा सत्र न्यायाधीश देशपांडे यांनी आजन्म कारावास व 2 वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे. खुशाबराव नत्थू भोयर (31 रा. आंबेडकर वॉर्ड खापा) असे आरोपीचे नाव आहे. अजाबराव नत्थू भोयर (34) असे हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या भावाचे नाव असून, निशा अजाबराव भोयर (30) असे फिर्यादी जखमीचे नाव आहे.
हेदेखील वाचा : सख्खा भाऊ ठरला पक्का वैरी! वडगाव मावळमध्ये लग्नाच्या किरकोळ वादातून केला भावाचा खून
हे प्रकरण 2021 मधील तीन वर्षापूर्वीचे आहे. आरोपी खुशाबराव भोयर याने अजाबराव भोयर या सख्ख्या भावाचा खून केला होता. खुशाबराव व त्याचा भाऊ हे दोघांची घरे शेजारी असून, त्यांच्यात शेतीच्या जागेवरुन जुना वाद सुरु होता. 20 नोव्हेंबर 2021 रोजी सकाळी 9 वाजताच्या सुमारास आरोपीची वहिनी निशा भोयर यांनी घराच्या ओसरीत चूल का मांडली? यावरुन भांडण केले. खुशाबरावने रागाच्या भरात भावाच्या डोक्यावर कुऱ्हाडीने घाव घातले. तर हल्ला होत असताना अजाबरावची पत्नी निशामध्ये आली. त्यावेळी वहिणीच्या डोक्यावरही कुऱ्हाड मारुन गंभीर जखमी केले. जखमी भावावर उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. दरम्यान याप्रकरणी आरोपीविरूद्ध गुन्हा नोंद करण्यात आला.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पोलिसांनी तातडीने घटनास्थळ गाठून तपासाला सुरुवात केली. प्राथमिक तपासादरम्यान प्रत्यक्षदर्शी साक्षदारांची विचारपूस करुन आरोपीला अटक करण्यात आले. सदर प्रकरणी दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. अतिरिक्त व जिल्हा सत्र न्यायाधीश देशपांडे यांच्या कोर्टात सुनावणी सुरू होती. गुन्हा सिद्ध झाल्याने न्यायालयाने खुशाबराव भोयर याला आजन्म कारावास 2 वर्षे सश्रम कारावासासह दंडाची शिक्षाही सुनावली आहे.
वडगाव मावळमध्ये सख्ख्या भावाने केली भावाची हत्या
राज्यामध्ये गुन्हेगारीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. तर दुसरीकडे, वडगाव मावळमध्ये भावांच्या नात्याला काळीमा फासणारी घटना घडली आहे. वडगावमावळमध्ये सख्खा भाऊच पक्का वैरी ठरला आहे. घरगुती वादाच्या कारणांवरुन थेट भावाचा भावाने जीव घेतला. ‘तुझी नात माझ्या मुलाला का देत नाहीस’, या क्षुल्लक कारणावरून सख्ख्या भावाने सख्ख्या भावावर जीवघेणा हल्ला केला.
छातीवर चाकूसारख्या धारदार शस्त्राने वार
छातीवर चाकूसारख्या धारदार शस्त्राने वार करून मोठ्या भावाचा खून केला. ही घटना शुक्रवारी (दि. २०) दुपारी दीड वाजताच्या सुमारास वडगाव मावळ रेल्वे स्टेशनच्या मोकळ्या जागेत घडली. या प्रकारामुळे वडगाव मावळमध्ये एकच खळबळ उडाली आहे. भावाने भावाचा खून केल्यामुळे सर्वांनी हळहळ व्यक्त केली आहे.
हेदेखील वाचा : Cyber Crime: आयटी हब व शिक्षणाच्या माहेरघरात पुणे पोलिसांची कामगिरी ‘सुमार’; गुन्हे वाढले, उघडकीचे प्रमाण अत्यल्प