कल्याण : नालेसफाई (Drain Cleaning) करताना एका कंत्राटी कामगाराला (Contract Worker) विजेचा झटका लागून त्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना (The shocking incident of his death due to electric shock) कल्याण पूर्व (Kalyan East) भागातील तिसगाव गावठाण (Tisgaon Gavthan) परिसरात आज दुपारी घडली आहे. ऋतिक कुरकुटे (Hrithik Kurkute) असे या तरुणाचे नाव असून कोळसेवाडी पोलिसांनी (Kolsewadi Police) या प्रकरणाचा तपास सुरु केला आहे. मात्र निष्काळजीपणामुळे या निष्पाप तरुणाचा बळी गेल्याचे समोर आले आहे. आता महावितरण वीज कंपनी आणि पोलिस काय कारवाई करणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
[read_also content=”आजचे राशीभविष्य : 22 June 2023, कसा जाईल आजचा दिवस; वाचा सविस्तर https://www.navarashtra.com/web-stories/daily-horoscope-22-june-2023-today-rashibhavishya-in-marathi-sagittarius-will-gain-respect-in-the-society-family-responsibilities-will-be-fulfilled-nrvb/”]
कल्याण पूर्व भागातील तिसगाव गावठाण येथील सिंकदर चाळीच्या बाजूला एका मोठ्या इमारतीचे बांधकाम सुरु आहे. त्याच्या बाजूला गटार आहे. इमारतीच्या शेडवर काही विजेच्या तारा लटकलेल्या होत्या. या वेळी दोन कामगार शेडच्या बाजूच्या गटाराची सफाई करीत होते.
दोघांपैकी ऋतिक कुरकुटे हा गटार सफाई करण्यासाठी गटारात उतरला होता. त्याचा सहकारी कामगार हा काही दूर कामासाठी गेला असता ऋतिक याचा जोराचा आवाज आला. त्याच्या सहकारी कामगाराने त्याला वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याचा प्रयत्न अपयशी ठरला. ऋतिक याचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाला. गटार सफाई करीत असताना त्याने इमारतीच्या संरक्षक पत्र्याचा आधार घेतला.
[read_also content=”‘या’ घरगुती उपायांनी दारूच्या व्यसनातून सुटका करणे होईल सोपे https://www.navarashtra.com/web-stories/how-to-get-rid-of-alcohol-addiction-these-home-remedies-will-make-it-easy-to-get-rid-of-it-nrvb/”]
त्याठिकाणी असलेल्या वीजेच्या तारेचा जोरदार झटका त्याला लागल्याने तो जागीच मृत्यूमुखी पडला.
या प्रकरणी पोलिसांनी तपास सुरु केला आहे. मात्र विजेची तार कोणाची होती. बिल्डर वापर होता की चाळकरी वापरत होते. हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिसांनी सखोल तपास करुन कामगाराच्या मृत्यूस जबाबदार असलेल्यांच्या विरोधात ठोस कारवाई करावी अशी मागणी केली जात आहे.