भंडारा : दोन दिवसांपूर्वीच लग्न झालेल्या नववधूने हळद निघण्यापूर्वीच सासरी गळफास घेऊन आत्महत्या (Married Woman Suicide) केली. अनिता नंदागवळी असे मृतक महिलेचे नाव आहे. या लग्नाच्या तिसऱ्या दिवशीच आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलल्याने सासरच्या मंडळींसह माहेरच्यांनाही धक्का बसला आहे.
अनिता हिच्या मूळ छत्तीसगडच्या अशोकनगर येथील आकाश नंदागवळी यांच्याशी लग्न झाले व 10 जून रोजी शहापूर येथे स्वागतसमारंभ पार पडला. बुधवारी (दि.12) तिला माहेरचे लोक नेण्याकरिता येणार होते. पाहुणे घरीच असताना तिने ‘वॉशरूम मधून येते’ म्हणून वरच्या माळ्यावर गेली. बराच वेळ होऊनही अनिता आली नाही. म्हणून वरच्या माळ्यावर जाऊन पाहिले असता अनिता बाथरूममध्ये गळफास घेतलेल्या स्थितीत आढळून आली.
तिला भंडारा येथील एका खाजगी रुग्णालयात नेण्यात आले. तेथे डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. जवाहरनगर पोलिसांनी पंचनामा करून प्रेत शवविच्छेदनाकरिता पाठविण्यात आले.