बीडचे बडतर्फ पोलीस अधिकारी रणजित कासले यांच्या अडचणी वाढल्या आहे. रणजित कासले विरोधात आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाजप आयटी सेलचे प्रदेश सहसंयोजक संभाजी सुर्वे यांच्या तक्रारीवरून सायबर विभागाने हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. रणजित कासले याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संबंधित सोशल मीडियाच्या माध्यमात बदनामीकारक आणि आक्षेपार्य विधान केल्याची तक्रार नोंदवली गेली आहे. या प्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या बीएनएस नुसार कलम 197, 353(2) माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2000, कलम 66 नुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय. परिणामी रणजीत कासलेच्या अडचणीत आता आणखी वाढ होणार असल्याचे बोललं जात आहे.
ACB summons to Anjali Damania: राजकारण तापणार! अंजली दमानियांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचं समन्स
बीडचे बडतर्फ पोलीस अधिकारी रणजित कासलेला नुकताच दिल्लीतून अटक करण्यात आली आहे. मुंबईतील गुन्हे शाखेच्या पथकाने त्याला दिल्लीतून अटक केली आहे. त्यांनतर त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला दोन दिवसांसाठी मुंबई गुन्हे शाखेच्या कोठडीत पाठवले. लोकप्रतिनिधींची बदनामीप्रकरण तसेच जातींमध्ये द्वेष निर्माण केल्याप्रकरणी कासलेला अटक झाली होती. दोन दिवसांची ही पोलीस कोठडी काल म्हणजेच सोमवारी (२ जून ) पूर्ण झाली आणि त्यानंतर पुन्हा किल्ला कोर्टात कोसलेला हजर केले. अश्यातच आता आणखी एका गुन्ह्यांची नोंद झाल्याने बडतर्फ पोलीस अधिकारी रणजित कासलेच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
यापूर्वी बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाणे आणि सायबर विभागात कासले दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहे. बीड येथील सामाजिक कार्यकर्ते मोहन आघाव यांच्या तक्रारीवरून बीडच्या सायबर पोलीस ठाण्यात दोन वेगवेगळ्या तक्रारीवरून दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसेच मुंबईत देखील कासले विरोधात गुन्हा दाखल आहे. दरम्यान दोन समाजात तेढ निर्माण करणे आणि राजकीय नेत्यांवर केलेल्या आरोप प्रकरणात कासलेला अटक करण्यात आली आहे.