अंजली दमानियांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचं समन्स
ACB summons to Anjali Damania: माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर केलेले भ्रष्टाचाराचे आरोप पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी त्या वेळी, “मी सर्व आरोप पुराव्यानिशी सिद्ध करणार,” असं ठामपणे सांगितलं होतं. त्यानंतर आता लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं (ACB) अंजली दमानियांना चौकशीसाठी हजर राहण्याचं समन्स पाठवलं आहे. धनंजय मुंडे यांच्या विरोधात अंजली दमानिया यांनी दाखल केलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने ही चौकशी होणार आहे.
दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात एकीकडे गंभीर आरोपांची मालिका सुरू असतानाच, दुसरीकडे सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी राज्याचे माजी कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे खळबळ उडाली होती. दमानिया यांनी मुंडे यांच्यावर कृषिमंत्री असताना सुमारे २४५ कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप केला होता. या प्रकरणाच्या चौकशीसाठी अंजली दमानियांना हे समन्स पाठवण्यात आल्याचे सांगितले जात आहे.
पावसाबाबत अत्यंत महत्त्वाची अपडेट; ‘यावर्षीचा पाऊस धो-धो, कमी दिवसांत…’
अंजली दमानिया यांनी माजी कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्या कार्यकाळातील कथित भ्रष्टाचारासंदर्भात राज्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (ACB) तक्रार नोंदवली होती. या तक्रारीच्या पार्श्वभूमीवर ACB ने दमानिया यांना चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स पाठवले आहे. “दमानिया या चौकशीसाठी उपस्थित राहिल्या नाहीत, तर “त्यांचा या प्रकरणात काहीही आक्षेप नाही” असे गृहीत धरून तक्रारीचा अर्ज दप्तरी दाखल केला जाईल.” असेही या पत्रात नमुद करण्यात आले आहे.
दरम्यान, मस्साजोग गावातील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणानंतर, भाजप आमदार सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांच्यावर टीकेची झोड उठवत आरोपांची मालिकाच सुरू केली होती. तर दुसरीकडे, अंजली दमानिया यांनीदेखील मुंडेंवर कृषी विभागातील सुमारे २४५ कोटी रुपयांच्या घोटाळ्याचे गंभीर आरोप केले. “मंत्रिमंडळाची परवानगी न घेता मुंडे यांनी मोठ्या प्रमाणात निधी वर्ग करण्याचे आदेश दिले. तसेच, महाविकास आघाडी सरकारच्या काळात सुरू झालेल्या कृषी योजनेंतर्गत झालेल्या आर्थिक अनियमिततेवरही त्यांनी लक्ष वेधले होते.” असे गंभीर आरोप दमानिया यांनी केले होते.
त्याचवेळी २०२२ मध्ये महाविकास आघाडी सरकारच्या काळात विदर्भ आणि मराठवा्यातील कापूस, सोयाबीन आणि इतर तेलबिया उत्पादक शेतकऱ्यांची उत्पादकता वाडवण्यासाठी एख विशेष योजना सुरू करण्यात आली होती. पण याच काळात कृषीमंत्री असताना धनंजय मुंडे यांनी या योजनेतील नियमांचं उल्लंघन करत कोट्यवधींचा घोटाळा केला, असाही आरोप करत अंजली दमानियांनी एकच खळबळ उडवून दिली होती.
नवीन अवतारात लाँच झाली VVIP लोकांची आवडती SUV, मिळणार जबरदस्त फीचर्स
या सर्व प्रकरणानंतर धनंजय मुंडे यांनी प्रत्युत्तर देत सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. ” कॅबिनेटमध्ये कृषी विभागातील खरेदी आणि थेट पुरवठ्याला मान्यता होती. अंजली दमानिया ज्याला पत्र म्हणत आहेत, ते पत्र नसून केवळ टिपण आहे. टिपणावर दिनांक टाकण्याचा प्रघात नाही असंही धनंजय मुंडे यांनी म्हटलं होतं.” असं धनंजय मुंडेंनी सांगितलं होतं. कॅबिनेट निर्णयाद्वारे मान्यता दिलेली खरेदी अद्याप झालीच नाही, त्यामुळे हे आरोप अर्धवट कागदपत्रांच्या आधारे बनवलेले आणि पूर्णतः खोटे आहेत. असा पलटवार मुंडे यांनी केला होता.
अंजली दमानिया यांनी सुमारे पावणेतीनशे कोटी रुपयांच्या कथित घोटाळ्याचे गंभीर आरोप केले होते. टेंडर प्रक्रिया न करता थेट कच्चा माल खरेदीसाठी पैसे वितरित करण्यात आले, ज्यामध्ये मोठ्या प्रमाणावर आर्थिक अपहार झाला. नॅनो युरियाची बाटली, जी बाजारात ९२ रुपयांना उपलब्ध असते, ती २२० रुपयांना खरेदी करण्यात आली. नॅनो डीओबी आणि इतर खतांच्या खरेदीत सुमारे ८८ कोटी रुपयांचा घोटाळा झाला. ५५७ रुपयांची खताची बॅग १२०० रुपयांना, आणि २४०० रुपयांचा फवारणी पंप तब्बल ३५०० रुपयांना खरेदी करण्यात आले, असे आरोप दमानिया यांनी केले होते.