खोपोली मंगेश काळोखे खून प्रकरणतील आरोपीला पुण्यातून अटक
उपायुक्त राजलक्ष्मी शिवणकर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक भाऊसाहेब पाटील, गुन्हे शाखेच्या पोलिस निरीक्षक संगीता जाधव, सहायक निरीक्षक उमाकांत महाडिक, उपनिरीक्षक अल्फाज शेख, सर्फराज देशमुख, अमोल पिलाने करत आहेत.
नुकत्याच झालेल्या नगरपालिका निवडणूकीनंतर खोपोलीतील माजी नगरसेवक मंगेश काळोखे यांचा खून करण्यात आला होता. त्यांची पत्नी या निवडणुकीत निवडून आली आहे. या निवडणुकीनंतर लगेचच हा खून झाल्याने राज्यभरात खळबळ उडाली होती. हडपसरमधील रामटेकडी औद्योगिक वसाहतीत एका ज्येष्ठ नागरिकाला मारहाण करुन त्यांच्याकडील सोनसाखळी हिसकाविण्यात आली होती. या गुन्ह्याचा तपास करताना उमर नूर खान, साहिल हबीब फकीर यांना अटक करण्यात आली होती. दोघांची चौकशी करण्यात आली, तेव्हा आरोपी खालीद कुरेशी हा गुन्हा करुन फरार झाल्याची माहिती त्यांनी दिली. त्यानंतर पोलिसांनी खालीद कुरेशीचा शोध सुरू केला.
तपासात खालिद हडपसरमधील हांडेवाडी भागात येणार असल्याची माहिती पोलिस उपनिरीक्षक अल्फाज शेख, सहायक निरीक्षक उमाकांत महाडिक यांना मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने त्याला सापळा लावून ताब्यात घेतले. चैाकशीत खालिदने खोपोलीतील माजी नगरसेवक मंगेश काळोखे यांचा दोन मित्रांशी संगनमत करुन खून केल्याची कबुली दिली. काळोखे यांचा खून करण्यासाठी त्यांना एकाने सुपारी दिल्याची माहितीही त्याने पोलिसांना दिली.






