मुंबई-अहमदाबाद महामार्गावर धक्कादायक प्रकार समोर आला आहे, या घटनेत एका निष्पाप बाळाचा बळी देखील गेला आहे. मुंबई अहमदाबाद प्रवासादरम्यान पालघर जवळ चालक विजय कुशवाह याने चालत्या कारमध्ये महिलेचा विनयभंग केल्याची धक्कादायक बाब पुढे आहे. या प्रकरणी पालघर पोलिसांनी विजय कुशवाहला अटक केली असुन या प्रकरणातील उर्वरीत आरोपींचा शोध सुरु आहे. पिडीतेवर अत्याचार केल्यानंतर तिला कार मधून ठकलून दिल्याची माहिती मिळत आहे. या मध्ये पीडिता गंभीर रित्या जखमी झाली आहे. तसेच महिलेवर अत्याचार फक्त टॅक्सी चालक नाही तर सहप्रवाशांनी देखील सामाविष्ट आहेत.
महिलेने अत्याचार होत असताना तिने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केल्यावर तिच्या केवळ १० महिन्यांच्या चिमुरडीला भरधाव कारमधून फेकून दिलं आणि त्यात तिचा मृत्यू झाला. महिलेवर अत्याचार केल्यानंतर महिलेस देखील कारमधून रस्त्याच्या कडाला फेकून दिल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे. प्रकरणी नराधमांवर 304 आणि 354 IPC नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.
Maharashtra |Case registered u/s 304&354 IPC in PS Mandvi, Palghar dist against one Vijay Kushwaha for allegedly molesting a woman in a moving car on Mumbai-Ahmedabad highway. In the incident, the woman’s 10-mnth-old child died.She’s currently under treatment at a hospital:Police
— ANI (@ANI) December 11, 2022