File Photo : Crime
चांदूरबाजार : बहिरम यात्रेत मित्रांसोबत शंकरपट पाहण्यास गेलेल्या तरुणाला पोलिसांनी काठ्यांनी मारहाण केली, असा आरोप जखमी तरुणाने तक्रारीतून केला आहे. ही लेखी तक्रार ग्रामीण पोलिस अधीक्षकांकडे देण्यात आली आहे. ही घटना बुधवारी (दि. 22) घडली.
हेदेखील वाचा : घरच्या ‘लक्ष्मी’चा चिमुकल्यासमोरच कात्रीने चिरला गळा: रक्ताच्या थारोळ्यातील Video रेकॉर्ड केला; म्हणाला, ‘मी तिला…’
चांदूरबाजार तालुक्यातील वणी बेलखेल येथील संजय ठाकरे (वय 32) हा तरुण आपल्या मित्रासह बहिरम यात्रेत शंकरपट पाहण्यासाठी गेला असता याचवेळी मंचाजवळ उपस्थित मद्यधुंद चार पोलिसांनी संजयला हटकले. याचवेळी चारपैकी एका पोलिसाने संजयच्या पायावर दोन दंडुके मारले. यावेळी तरुणाने हटकले असता संबंधित चार पोलिसांनी बेदम मारहाण केली.
तसेच खिशातील सहा हजार रुपये सुध्दा काढून घेतले. तेव्हा यातील पोलिस हे, यात्रेकरूंचे रक्षक की भक्षक? असा प्रश्न निर्माण झाला. त्यामुळे ग्रामीण पोलस अधीक्षक कोणती कारवाई करतात. याकडे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.
खोटे गुन्हे दाखल करण्याची धमकी
पोलिसांकडून आपल्याला झालेल्या विनाकारण मारहाणीची तक्रार देण्यासाठी संजय ठाकरे यांनी यात्रेतील पोलिस चौकी गाठली. येथे तरी आपल्या न्याय मिळेल अशी त्यांना आशा होती. मात्र, चौकीतील पोलिसांनी सुध्दा त्यांना घरी जा, अन्यथा खोटे गुन्हे दाखल करू, पोलिसांच्या कामात अडथळा निर्माण केला, असा गुन्हा दाखल करू, अशी धमकी पोलिसांनी दिली.
जुगाराच्या अड्ड्यावर तासगाव पोलिसांचा छापा
तासगाव येथील दत्त माळावर वीज महावितरण कंपनीच्या कार्यालयासमोर बेकायदेशीररित्या सुरू असणाऱ्या जुगाराच्या अड्ड्यावर तासगाव पोलिसांनी बुधवारी रात्री छापा टाकला. हा अड्डा उध्वस्त करून सुमारे १ लाख ८० हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेदेखील वाचा : फी भरली नाही म्हणून दिवसभर वर्गाबाहेर उभं केलं, घरी आल्यानंतर आठवीच्या विद्यार्थ्याने उचललं टोकाचं पाऊल