मुंबई: मुंबईच्या अंधेरी पूर्वेत न्यू पोलीस वसाहतीमध्ये एका पोलीस हवालदारने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. आत्महत्या करणारे हवालदार मरोळ एल (LA) मध्ये कार्यरत होते. मागील तीन ते साडेतीन महिन्यापासून मरोळ LA मध्ये नोकरीपासून पोलीस हवालदार गैरहजर होते. त्यांना तीन महिन्यापासून काविळीचा आजार होता. त्यांचा या आजारावर उपचार सुरू होता. या उपचारादरम्यान त्यांची पत्नी आपल्या दोन मुलांना घेऊन माहेरी निघून गेल्यामुळे पोलीस हवालदार तणावात होते. मागितलं तीन ते साडेतीन महिन्यापासून मरोळ LA मध्ये देखील नोकरीपासून पोलीस हवालदार गैरहजर होते.
BJP Crime News: पती, पत्नी और ‘वो’! भाजप नेत्याचे कांड…; गळा घोटून पत्नीची केली हत्या
त्यांची पत्नी मुलं नसल्यामुळे आणि आजारांपासून ते ट्रस्ट असल्याने पोलीस हवालदाराने काल आपल्या घरामध्ये पंख्यामधून गळफास लावून आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी पोलीस हवालदार यांनी सुसाईड नोट लिहून ठेवली होती. आजरापासून तणावात आणि कुटुंबासोबत नसल्याच्या तणावातून आत्महत्या करत आहेत असं लिहून आत्महत्या केली. सध्या अंधेरी पोलिसांनी या प्रकरणी एडीआर दाखल करून पोलीस हवलदार ने टोकाचा पाऊल का उचलला ? या संदर्भात अधिक तपास करत आहे.
पत्नीच्या विवाहबाह्य संबंधाला कंटाळून एका नेत्याने संपवले आयुष्य
बुलंदशहर येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पत्नीच्या वर्तनाला आणि मानसिक छळाला कंटाळून एका नेत्याने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव सोहित असे आहे. तो समाजवादी पक्षाचा आंबेडकर वाहिनीचा राज्य सचिव होता. आत्महत्या करण्यापूर्वी सोहितने एक व्हिडीओ बनवला. त्या व्हिडिओमध्ये त्याने पत्नीवर आणि तिच्या कुटुंबावर गंभीर आरोप केले आहे.
सोहितने व्हिडिओमध्ये काय म्हंटले?
सोहितने आपल्या व्हिडिओमध्ये म्हंटले की, ‘मी लवकरच आत्महत्या करणार आहे. माझ्या पत्नीने आणि तिच्या कुटुंबाने मला खूप त्रास दिला आहे, हे मी आता सहन करु शकत नाही. मरण्यापूर्वी मी माझ्या पत्नीच्या अवैध संबंधांबद्दल सांगू इच्छितो. मी माझी पत्नी तमन्नासोबत तीन वर्षांपासून राहत आहे. आमचे कोर्ट मॅरेज झाले. आम्ही दोघेही कायदेशीररित्या पती-पत्नी होतो. तिच्याकडे ट्यूशन फी भरण्यासाठी पैसे नव्हते, मात्र मला तिचे वागणे आवडले त्यामुळे मी तिला स्वीकारले.जेव्हा घरात एखादा कार्यक्रम असायचा तेव्हा तमन्ना त्यात सहभागी व्हायची.
मी आणि माझ्या कुटुंबाने तमन्नाचा आदर करण्याचा प्रयत्न केला. पण मला समजले नाही की तिचे तिच्या आत्याच्या मुलाशी अवैध संबंध आहेत. मला तिच्यावर संशय आल्यानंतर मी ही माहिती बाहेर समजू दिली नाही. तिने सांगितले की बाहेर शिक्षण घ्यायचे आहे. पण तिच्या आत्याचा मुलगा दिल्लीत शिकत होता, म्हणून मी तिला दिल्लीला जाऊ दिले नाही. त्यानंतर तिने घटस्फोट मागायला सुरुवात केली. कुटुंब तुटू नये म्हणून आम्ही वेगळं राहत होतो, मात्र तरीही तिचे प्रेमसंबंध सुरूच होते असं म्हणत सोहितने जीवन संपवलं.