छत्रपती संभाजीनगर: राज्याचे महसूल मंत्री असल्याचे सांगत शेतकऱ्याला पैश्यांची मागणी करत फसवणूक करण्यात आल्याचे समोर आलं आहे. अज्ञात व्यक्तीने आधी फोन करून बावनकुळे साहेबांचा पीए असलयाचे सांगितले त्यानंतर तुमचे काम मार्गी लावण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर स्कॅनर पाठवत पैश्यांची मागणी करण्यात आली. शेतकऱ्याला आपली फसवणूक होत असल्याचे लक्षात येताच पोलीस ठाण्यात धाव घेतली. या विरोधात छत्रपती संभाजीनगर येथील पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलिसांनी अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हाही दाखल करण्यात आला आहे.
तुझ्याकडे पैसे नसतील तर तुझ्या बायकोला…; पुण्यातील संतापजनक प्रकार उघडकीस
नेमकं काय प्रकरण?
तक्रार दिलेल्या शेतकऱ्याचे नाव जगन्नाथ जयाजी शेळके असे नाव आहे. त्यांनी महसूल मंत्री चंद्रशेकर बावनकुळे यांच्या फेसबुक पेजवरती त्यांनी आपली अडचण मांडली होती. त्यांनी आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी रस्ता अडवून माझी वडिलोपार्जित शेती पडीक पडली आहे, त्यामुळे मला लागवड करता येत नाही, असे त्यांनी म्हंटले होते. त्यानंतर एका अज्ञात व्यक्तीने पीडित शेतकऱ्याला फोन केला, मी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा पी.ए. बोलत असल्याचे सांगितले. रस्त्याची मोजणी करण्यासाठी माणसे पाठवतो. मात्र, पोलीस बंदोबस्तासाठी पैसे भरावे लागतील त्यासाठी क्यूआर कोड पाठवत पैशांची मागणी संबंधित व्यक्तीने केली होती. दोघांमध्ये फोनवरुन संभाषण झालं होतं, शेतकऱ्याने ते संभाषणही पोलिसांपुढे दाखल केलं आहे.
पीडित शेतकऱ्याला अश्याप्रकारे दोनदा अज्ञात व्यक्तीने पैश्याची मागणी केली. त्यावेळी, आपलं काम मार्गी लागेल म्हणून शेतकऱ्याने 3 हजार रुपये देखील पाठवले होते. मात्र, त्यानंतरही पैशांची मागणी होत असल्याने आपली फसवणूक होत असल्याचा संशय शेतकऱ्याला आहे. शेतकऱ्याला संशय आल्याने त्यांनी पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली आहे. दरम्यान, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नावाचा वापर करत शेतकऱ्याची फसवणूक करणारा हा व्यक्ती कोण? याचा तपास करणे पोलिसांपुढे आव्हान असणार आहे. सध्या, छत्रपती संभाजीनगरचे पोलीस कॉल रेकॉर्डिंगच्या आधारे पुढील तपास करत आहेत.
कराडमध्ये रिक्षात चक्क घरगुती गॅस भरला; पोलिसांनी दोघांवर केली मोठी कारवाई
कराड शहरासह मलकापूर परिसरात बेकायदेशीर विनापरवाना घरगुती गॅस रिक्षात भरण्याचे प्रकार दिवसेंदिवस समोर येत आहेत. त्यात अशातच आता सैदापूर कॅनॉल ते मसूर जाणाऱ्या रोडवर सूर्या मस्तानी कॅफेच्या पाठीमागील बाजूला बेकायदेशीर विनापरवाना घरगुती गॅस टाकीतून पाईपच्या सहाय्याने रिक्षात गॅस भरताना पोलिसांनी कारवाई केली आहे. या कारवाईत पोलिसांनी चौदा हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
याप्रकरणी दोन जणांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. याबाबत पोलिस हवालदार महेश शिंदे यांनी कराड शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. स्वप्निल सुनिल यादव (वय २८, रा. सैदापूर कॅनॉल, ता. कराड) व शिवाजी जाधव अशी गुन्हा नोंद झालेल्यांची नावे आहेत.
Delhi Crime: दिल्ली हादरली! ६५ वर्षीय आईवर पोटच्या पोराकडून अत्याचार; आधी बुरखा उतरवला, नंतर