केरळच्या कोर्टाने युवतीला सुनावली फाशीची शिक्षा (फोटो- सोशल मिडिया)
तिरूवअनंतपुरम: केरलची राजधानी तिरूवअनंतपुरमच्या जिल्हा कोर्टाने एका युवतीला फाशीची शिक्षा सुनावली आहे. जिल्हा कोर्टाने एका 24 वर्षीय युवतीला फाशीची शिक्षा सुनावली आहे. कोर्टाने हा दुर्मिळ असा खटला म्हणत 24 वर्षीय युवतीला फाशीची शिक्षा सुनावली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, हे 2022 चे प्रकरण आहे. ऑक्टोबर 2022 मध्ये युवतीने आयुर्वेदिक टॉनिकमध्ये विष मिसळले आणि प्रियकराला पाजले. ज्यामुळे युवतीच्या प्रियकराचा मृत्यू झाला होता.
समोर आलेल्या महितीनुसार, त्या युवतीचा प्रियकर त्या मुलीवर जिवापाड प्रेम करत होता. मात्र त्या युवतीचा विवाह दुसऱ्या ठिकाणी ठरला होता. त्यामुळे युवतीला आपल्या प्रियकरापासून पिच्छा सोडवायचा होता. मात्र यासाठी तिचा प्रियकर तयार नव्हता. त्यामुळे युवतीने आपल्या काकांच्या मदतीने तीच्या प्रियकराची हत्या केली. दोषी ठरलेल्या युवतीच्या काकांना हत्या करण्यासाठी मदत करणे तसेच पुरावे मिटवण्याच्या गुन्ह्यात दोषी ठरवण्यात आले.
कोर्टाने समजले गंभीर प्रकरण
युवती सुशिक्षित आहे. तीच्यावर या आधी कोणताही गुन्हा दाखल नाही. पालकांची ती एकुलती एक मुलगी आहे. त्यामुळे तीची शिक्षा कमी करावी अशी विनंती युवतीच्या वकिलांनी कोर्टासमोर केली होती. मात्र कोर्टाने आपला निर्णय बदलला नाही. 586 पानांच्या निकालात कोर्टाने आरोपीचे वय आणि परिस्थिती विचारात घेणे योग्य मानले आहे. अटक झाल्यानंतर युवतीने जीव देण्याचा प्रयत्न केला होता. हा प्रकार खटल्यापासून लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न असल्याचे कोर्टाने म्हटले.
कशी केली प्रियकराची हत्या
14 ऑक्टोबर 2022 मध्ये युवतीने प्रियकराला आपल्या घरी बोलावले होते. यावेळी तिने आयुर्वेदिक टॉनिकमध्ये विष मिसळून त्याला पिण्यास दिले. थोड्या काळाने प्रियकर तीच्या घरातून बाहेर पडला आणि त्याची तब्येत खराब होण्यास सुरुवात झाली. त्याच्या कुटुंबाने त्याला रुग्णालयात उपचारांसाठी दाखल केले. मात्र तयाचा मृत्यू झाला. कोर्टाने युवतीला फाशीची शिक्षा सुनावली आहे. प्रियकरच्या कुटुंबाने कोर्टाच्या निर्णयाचे स्वागत केले आहे.
शिक्षिकेने १३ वर्षांच्या विद्यार्थ्यासोबत ठेवले शारीरिक संबंध
अमेरिकेतील एका प्राथमिक शाळेतील शिक्षिकेने तिच्या १३ वर्षांच्या माजी विद्यार्थ्याशी लैंगिक संबंध ठेवले. दोघेही वर्षानुवर्षे एकत्र राहत होते. या काळात शिक्षिका गर्भवती राहिली आणि दोघांनाही एक मुलगा झाला. न्यू यॉर्क पोस्टच्या वृत्तानुसार, न्यू जर्सी येथील प्राथमिक शाळेतील पाचवी इयत्तेत शिकणाऱ्या लॉरा कॅरॉन हिचे एका विद्यार्थ्यासोबत अनुचित लैंगिक संबंध असल्याचा आरोप आहे. २०१६ ते २०२० दरम्यान दोघेही त्याच्या घरात एकत्र राहत होते.
मिळालेल्या माहितीनुसार, मुलाला पहिल्यांदा भेटली जेव्हा ती त्याला आणि त्याच्या भावाला पाचवीत शिकवत होती. पोलिसांनी सांगितले की, बाळाचा जन्म २००५ मध्ये झाला होता. मुलाच्या पालकांनी त्यांच्या मुलाला आणि मुलीला करेनच्या घरी काही रात्री घालवण्याची परवानगीही दिली. त्या काळात, करेनने तिच्या माजी विद्यार्थ्यासोबत अनुचित लैंगिक संबंध ठेवले आणि नंतर ती गर्भवती राहिली असा आरोप आहे. अभियोक्ता कार्यालयाने सांगितले की तिने २०१९ मध्ये मुलाला जन्म दिला आणि त्यांच्या मुलाचा जन्म झाला तेव्हा तो मुलगा १३ वर्षांचा होता. त्यावेळी करेन २८ वर्षांची होती. डिसेंबरमध्ये फेसबुक पोस्ट पाहिल्यानंतर मुलाच्या वडिलांनी करेनच्या मुलामध्ये, स्वतःमध्ये आणि स्वतःच्या मुलामध्ये साम्य असल्याचे निदर्शनास आणून दिल्यानंतर तपासकर्त्यांना कथित लैंगिक शोषणाची माहिती मिळाली.