तरुणीच्या छातीवर वार, चेहऱ्याला मानवी विष्ठा लावून तोंडात कोंबून..., ओडिशातील धक्कादायक प्रकार समोर (फोटो सौजन्य-X)
Odisha Crime News Marathi : ओडिशातून एक अशी घटना समोर आली आहे ज्याने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ओडिशातील गुंडांनी आधी एका आदिवासी मुलीला मारहाण करून मानवी विष्ठा खाण्यास भाग पाडल्याचे वृत्त आहे. या घटनेनंतर आदिवासी संघटनांमध्ये संताप असून निदर्शने करण्यात येत आहेत. सध्या पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपी फरार असल्याची माहिती दिली असून त्याला पकडण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
बोलंगीर जिल्ह्यात 16 नोव्हेंबर रोजी ही तरुणी गावातील तलावात आंघोळ करुन घरी परतत असताना ही घटना घडली. गावातील रहिवसी अभय बाघ याने तिच्यावर हल्ला केला आणि जातीवाचक अपशब्द वापरल्याचा आरोप तिने केला. तरुणीने बांगोमुंडा पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल केली असून पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला आहे.
एफआयआरनुसार, आरोपी गैर-आदिवासी पुरुष महिलेच्या शेतातून ट्रॅक्टर घेऊन पिकाचे नुकसान करत होता, त्यावर महिलेने त्याचा विरोध केला. यावर आरोपीने तिच्यावर प्राणघातक हल्ला केला आणि जबरदस्तीने तिच्या तोंडात मानवी विष्ठा फासली आणि जबरदस्तीने तोंडात कोंबल्याचा धक्कादायक प्रकार घडला. मारहाणीसोबतच आरोपीने मुलीला जातीवाचक शब्दही बोलल्याचे वृत्त आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, 16 नोव्हेंबरला ही महिला तलावात आंघोळ करून घरी जात होती. गावातील रहिवासी अभय बाग याने आपल्यावर हल्ला केल्याचा आरोप पीडितेने केला. बाघ याने तिच्या छातीवर वार केल्याने ती खाली पडल्याची तक्रार करण्यात आली आहे. यावेळी पीडितेची आई मुलाला वाचवण्यासाठी आली असता आरोपीने तिच्या आईवर ही हल्ला केला. वाघाने तिच्या चेहऱ्यावर मानवी विष्ठा लावली आणि ती खाण्यास भाग पाडल्याचा आरोप मुलीने केला आहे.
याप्रकरणातील आरोपीने तिच्या शेतजमिनीवर ट्रॅक्टर चालवून तिच्या पिकांचं नुकसान केलं होतं. याबद्दल तिने जाब विचारला होता. त्यामुळे हा प्रकार घडल्याचा आरोप या संबंधित तरुणीने केला आहे. कांताबंजी उपविभागीय पोलीस अधिकारी (एसडीपीओ) गौरांग चरण साहू यांनी आरोपी फरार असल्याचं सांगितलं असून त्याला अटक करण्याचे आश्वासन दिले आहे.
या घटनेनंतर स्थानिक आदिवासी संघटनांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून त्यांना तातडीने न्याय देण्याची मागणी होत आहे. आदिवासी कल्याण संघाच्या सदस्यांनी आरोपींवर कडक कारवाई करण्याचे मान्य केले असून प्रशासनाने तातडीने कारवाई न केल्यास आंदोलन करण्याचे संकेत दिले आहेत. स्थानिक सामाजिक कार्यकर्ते अजित जोशी यांनी या हल्ल्याचा निषेध करत हे निंदनीय कृत्य असल्याचे सांगितले. त्यांनी जिल्हा प्रशासनाला विलंब न लावता आरोपींना अटक करून न्याय मिळवून देण्याची विनंती केली. पुढील पोलिस तपास सुरू आहे.