धक्कादायक ! 13 वर्षांच्या मुलाची गळा चिरून हत्या
पुण्याच्या पानशेतमध्ये दगडाने ठेचून आदिवासी तरुणाची हत्या करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. ही घटना वर्दळ असलेल्या पानशेत येथील दाट लोकवस्तीच्या रस्त्यावर लाथा बुक्क्या आणि दगडाने ठेचून युवकाचा निर्घृण हत्या करण्यात आली. हत्या केल्यानंतर सगळे आरोपी फरार झाले. पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलं आहे. मृतकाचे नाव रोहिदास काळुराम काटकर ( वय २४, रा.कादवे, ता. राजगड) असे आहे. या घटनेमुळे पानशेत वरसगाव परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. ही हत्या का करण्यात आली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही आहे. मात्र या घटनेमुळे पानशेत वरसगाव परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
‘डेडबॉडीला कपडा नीट गुंडाळून देतो, 2 हजार द्या’; वाशी रुग्णालयातील अमानुष प्रकार समोर
नेमकं काय घडलं?
ही हत्या रविवारी (१५ जुन ) रोजी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास पानशेत येथे नंदाबाई कुंभार यांच्या हॉटेल समोर घडला. मृतक रोहिदास काळुराम काटकर
आणि मोसे (ता. राजगड) येथील विजय पांडुरंग जाधव हे दोघेही जण पानशेत येथे नंदाबाई कुंभार यांच्या हॉटेल समोर उभे होते. दरम्यान मोटारसायकलवरून २० ते २५ वयोगटातील पाच अज्ञात हल्लेखोर आले. आणि त्यांनी अचानक रोहिदास काटकर यांचावर लाथा बुक्क्यांनी एकाच वेळी मारहाण केली. मयत रोहिदास काटकर याच्यावर एकाच वेळी सर्व हल्लेखोरांनी लाथा बुक्क्यांनी जोरदार प्रहार केले. त्यावेळी एका हल्लेखोराने रस्त्यावर पडलेल्या मोठ्या दगडाने रोहिदास याच्या छातीवर जोरदार प्रहार केला. याचवेळी रोहिदास याचा जागीच मृत्यू झाला. यासोबतच विजय जाधव देखील या हल्ल्यात जखमी झाला.
याप्रकरणी मयत रोहिदास याचा भाऊ अविनाश काटकर यांनी वेल्हे पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. पोलीस फरार हल्लेखोरांचा शोध घेत आहेत. आणि अधिक तपास पोलीस करत आहे. पानशेत बाजारपेठ, पानशेत वसाहत तसेच पुणे -पानशेत रस्त्यावरील सीसीटीव्ही कॅमेराच्या फुटेजच्या आधारे हल्लेखोरांचा शोध घेतला जात आहे. हल्लेखोर दुचाकी गाड्यावरुन आले होते तसेच ते त्याच गाड्यावरून फरार झाल्याचे प्राथमिक पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे, असे पानशेत पोलिस चौकीचे पोलिस अंमलदार आकाश पाटील यांनी सांगितले.
आरोपीकडून पोलीस उपनिरीक्षकांच्या अंगावर गाडी घालून जीवे मारण्याचा प्रयत्न; दोन आरोपींना अटक