जळगाव जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. आरोपींचा पाठलाग करत असतांना आरोपींची पोलीस उपनिरीक्षकांच्या अंगावर गाडी घातली. त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला आहे. गुरांची तस्करी करणाऱ्या आरोपीला पकडण्याचा प्रयत्न करत असतांना आरोपींकडून चारचाकी रिव्हर्स घेत संदीप पाटील यांच्या अंगावर घालण्याचा प्रयत्न केला. या घटनेमध्ये स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांना दुखापत झाली. त्यांच्या बोटाला, पायाला आणि पोटाजवळील बारगड्यांना दुखापत झाली आहे. या घटनेत पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली असून चोरीस गेलेला बैल. चारचाकी वाहन, छोटी तलवार, गुप्ती तसेच लोखंडी रॉड आदी जप्त करण्यात आलं आहे.
‘डेडबॉडीला कपडा नीट गुंडाळून देतो, 2 हजार द्या’; वाशी रुग्णालयातील अमानुष प्रकार समोर
नेमकं काय घडलं?
जळगाव जिल्ह्यात पोलीस निरीक्षक संदीप पाटील हे मुक्ताईनगर येथून गुरांची तस्करी करणाऱ्या वाहनाला तसेच आरोपीला पकडण्याचा प्रयत्न करत होते. पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांनी जळगाव ते अकोला असे तब्बल १०० किलोमीटर आरोपीच्या वाहनाचा पाठलाग केला. अकोला पोलिसांच्या मदतीने नाकाबंदी करण्यात आली. यावेळी आरोपीला अटक करण्याचा प्रयत्न करत असतांना आरोपीने वाहन रिव्हर्स घेऊन पोलीस निरीक्षकांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला. तेव्हा पोलीस निरीक्षक संदीप पाटील खाली पडले आणि जखमी झाले. त्यानंतर त्यांनी आहे त्या अवस्थेत उभे राहून आरोपीच्या मुसक्या आवळल्या. तीन आरोपी फरार झाले. या प्रकरणी मुक्ताईनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पाळीव प्राण्यांनी उकललं खुनाचं गूढ! बेळगावात बकरी आणि कुत्र्यांच्या मदतीने पोलिसांनी पकडला खुनी भाऊ
बेळगावात एका खुनाचा गुंता सोडवण्यात पाळीव प्राण्यांनी मदत केल्याचे अनोखे प्रकरण उघडकीस आले आहे.इथे एका मेंढपाळाच्या निर्घृण खुनाचा तपास मानव पुरावे गहाळ असतानाही पाळीव प्राण्यांच्या वागणुकीवरून करण्यात आला. या गुंत्यात जेव्हा कोणीही प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नाही, ना मोबाईल लोकेशन, ना सीसीटीव्ही पोलिसांची एकही साधी माहिती उपयोगी आली नाही, तेव्हा खरा शोध बकरी आणि कुत्र्यांनी लावला. सविस्तर बातमी
पुन्हा एका विवाहितेची आत्महत्या; सासरच्या छळाला कंटाळूनच गर्भवती महिलेने संपवलं जीवन