नवी मुंबई महापालिकेच्या रुग्णालयातील शवगृहात मृतदेह गुंडाळण्यासाठी लागणाऱ्या कापडासाठी तब्बल २ हजार रुपये लाच मागितल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याचा व्हिडीओ सोशिअल मीडियावर व्हायरल झाला असून, नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
पाळीव प्राण्यांनी उकललं खुनाचं गूढ! बेळगावात बकरी आणि कुत्र्यांच्या मदतीने पोलिसांनी पकडला खुनी भाऊ
नेमकं काय प्रकार?
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, एका २३ वर्षीय तरुणीने आत्महत्या केली होती. ही मुलगी मूळची कानपुर येथील असून, नवी मुंबईतील ऐरोली परिसरात पेइंग गेस्ट म्हणून राहत होती. ती एका आयटी कंपनीमध्ये काम करत होती. रविवारी तिने पहाटे राहत्या खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केली. मृत्यची महियी मिळताच तिचे आई- वडील उत्तर प्रदेशहुन तात्काळ नवीमुंबईत दाखल झाले. मृतदेह ताब्यात घेण्यासाठी ते वाशी रुग्णालयात गेले असता, शवगृहातील कर्मचाऱ्यांनी मृतदेह गुंडाळण्याची लागणाऱ्या कपड्यांच्या नावाखाली पैश्यांची मागणी केल्याचा संतापजनक प्रक्रार समोर आला आहे.
कपडे व्यवस्थित गुंडाळून देतो….
शवगृहातील कर्मचाऱ्यांनी मृत तरुणीच्या वडिलांकडून प्रथम एक हजार रुपये मागितले होते. परंतु नातेवाईक भावनिक अवस्थेत असल्याचे लक्षात घेऊन रक्कम थेट 2 हजारांपर्यंत वाढवली. “कपडे व्यवस्थित गुंडाळून देतो” असे म्हणत पैसे उकळले. हा संपूर्ण प्रकार कॅमेरात कैद झाला. व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार वायरल होत आहे.
नवी मुंबई महापालिकेच्या वाशी रुग्णालयात संतापजनक प्रकार, शवागृहामध्ये एका मृतदेहाला गुंडाळण्यासाठी लागणाऱ्या कापडासाठी २ हजार रुपये उकळण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.#navimumbai #crimenews #Police pic.twitter.com/mDm9JOGKb1
— Ankita Shantinath Khane (@KhaneAnkita) June 17, 2025
या प्रकारावर महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. मात्र नातेवाईकांनी महापालिकेच्या प्रशासनावर संताप व्यक्त करत जवाबदार कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे. “मुलीच्या मृत्यूने आधीच आम्ही खचलो आहोत, त्यातही अशा वागणुकीमुळे अधिकच वेदना झाल्या,” असं त्या कुटुंबीयांनी म्हटलं आहे.
पुन्हा एका विवाहितेची आत्महत्या; सासरच्या छळाला कंटाळूनच गर्भवती महिलेने संपवलं जीवन