छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यातील भिवधानोरा शिवारात रविवारी दुपारी एका तरुणाचा संशयास्पद मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. मृत व्यक्तीचे नाव राहुल रमेश नवथर असे आहे. त्याच्या छातीवर व हातावर गंभीर जखमा दिसून आल्याने गोळ्या झाडून हत्या झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
सावत्र आई पक्की वैरीण…! 6 वर्षाच्या चिमुकलीला तिसऱ्या मजल्यावरून क्रुरतेने ढकलतानाचे CCTV फुटेज समोर
नेमकं काय घडलं?
मिळालेल्या माहितीनुसार, गावातील एक शेतकरी गुरांसाठी गवत आणण्यासाठी शिवारात गेला होता. त्यावेळी त्याला एक मृतदेह पडलेला दिसला. त्याने तात्काळ गावातील पोलीस पाटील यांना याची माहिती दिली. माहिती मिळाल्यानंतर पोलीस पाटील व ग्रामस्थांनी गंगापूर पोलिसांशी संपर्क साधताच तातडीने पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करण्यात आला. फॉरेन्सिक टीम आणि श्वानपथक देखील तपासण्यासाठी बोलावण्यात आले. मृतदेहाजवळ कोणतीही शस्त्रं किंवा पुरावे मिळाले नाहीत. परंतु छातीवर व हातावर झालेल्या छिद्रांमुळे हा खून गोळ्या झाडून झाल्याची प्राथमिक शंका उपस्थित होत आहे.
पोलीस तपास सुरु
गंगापूर पोलिसांनी घटनेची नोंद करून तपासाला सुरुवात केली आहे. फॉरेन्सिक तपासणीचा अहवाल आल्यानंतर मृत्यूचं नेमकं कारण स्पष्ट होणार आहे. प्राथमिक माहितीनुसार, राहुल नवथर यांचा काही दिवसांपासून वाद सुरू असल्याची चर्चा गावकऱ्यांमध्ये आहे. मात्र हा खून वैयक्तिक वादातून झाला की इतर कुठल्या कारणातून, हे अजून स्पष्ट झालेलं नाही. वैयक्तिक वाद, जुना राग की इतर काही कारण याबाबत विविध चर्चा गावकऱ्यांमध्ये सुरू आहेत. गंगापूर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपासाची चक्रं वेगाने फिरवत आहेत.
गावात भीतीचं वातावरण
गावकरी मोठ्या संख्येने घटनास्थळी जमले होते. दुपारी उघडकीस आलेल्या या घटनेनंतर परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या घटेनमुळे नागरिकांमध्ये भीतीच वातावरण निर्माण झाला आहे.
आईने अभ्यास करण्यासाठी रागावले म्हणून 18 वर्षीय नर्सिंग उचलले टोकाचे पाऊल
दरम्यान छत्रपती संभाजीनगरमधून मंगळवारी एक हृदयपिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. आईने अभ्यास करण्यासाठी रागावले म्हणून १८ वर्षीय तरुणीने टोकाचे पाऊल उचलल्याचे समोर आले आहे. या घटने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. आत्महत्या करण्याऱ्या मुलीचे नाव विशाखा अनिल वक्ते असे आहे. तिने नुकताच नर्सिंगच्या अभ्यासक्रमात प्रवेश केला होता. तिने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे समोर आले आहे.