काय नेमकं प्रकरण?
मृत महिलेच्या मुलीचे गावातील एका तरुणासोबत प्रेमसंबंध होते. दोघांचा धर्म वेगळा होता. काही महिन्यांपूर्वी ते दोघेही घरातून पळून गेले आणि त्यांनी कथितरित्या विवाह केला. त्यांनतर तरुणी आपल्या पतीसोबत राहू लागली होती. तरुणीची आई गंभीर असून नातेसंबंधाला तिचा विरोध होता. दोघांचाही धर्म वेगळा असल्याने यावरून अनेकदा वादविवाद देखील झाला होता. याच वादातून तरुणीचा नवरा लवकुशने आपल्या पत्नीच्या माहेरी जाऊन दोन साथीदारांच्या मदतीने सासूची कुऱ्हाडीने हत्या केली, असा कुटुंबीयांनी आरोप केला.
पोलिसांनी केला पंचनामा
याघटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांना माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदन केले. फॉरेन्सिक पथकाने घटनास्थळावरून काही पुरावे गोळा केले आहे. पोलीस या घटनेचा तपास करत आहे.
…तर ती जिवंत असती
मृत महिलेच्या कुटुंबीयांनी सांगितलं की, मुलीचे तरुणाशी प्रेमसंबंध होते. त्यानंतर तिने संबंधित तरुणाशी विवाह केला. तेव्हापासून कुटुंबात तणावाचं वातावरण निर्माण झालं. जर मुलीने विवाह केला नसता, तर तिची आई आज जीवंत असती.
बंद खोलीत जळालेला मृतदेह; पोलिस तपासात समोर आलं अंगावर काटा आणणारं सत्य; पत्नीने पेट्रोल…
उत्तर प्रदेशातील फतेहपूर जिल्ह्यातील एका घरातून समोर आलेल्या घटनेने संपूर्ण परिसर हादरला आहे. सुरुवातीला आत्महत्या असल्याचा संशय व्यक्त केला जात असलेल्या प्रकरणाचा पोलिसांनी तपास केला असता, त्यामागे थरकाप उडवणारा कट असल्याचे उघड झाले. सततच्या कौटुंबिक वादानंतर पत्नीनेच पतीला जिवंत जाळून ठार केल्याची धक्कादायक बाब तपासात समोर आली असून, आरोपी महिलेला पोलिसांनी अटक केली आहे.
Jalna Crime: पैशांच्या वादातून गळा आवळून हत्या; मृतदेह नदीत फेकला, डीएनए चाचणीने उघड केलं रहस्य
Ans: उत्तर प्रदेशातील बांदा जिल्ह्यात.
Ans: मुलीच्या प्रेमविवाहाला सासूचा विरोध असल्याचा राग.
Ans: गुन्हा दाखल करून तपास सुरू केला असून फॉरेन्सिक पथकाने पुरावे गोळा केले आहेत.






