केवळ 2 हजार रुपयांसाठी कामगाराने जाळले मालकाचे दोन ट्रक; आधी दारू प्यायला अन् नंतर... (फोटो सौजन्य-X)
मुंबई : देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतील अंधेरी (पश्चिम) येथील लोखंडवाला परिसरातील एका इमारतीला आज (26 एप्रिल) सकाळच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली. या दुर्दैवी आगीच्या घटनेत एका ३४ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. तसेच 6 जण जखमी झाल्याची ही माहिती मिळत आहे. या जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघातात इतर ६ जण जखमी झाल्याचे वृत्त आहे. ज्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, जिथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
या घटनेची मुंबई अग्निशमन विभागाकडून माहिती देताना सांगितले की,आठ मजली इमारतीच्या पहिल्या मजल्यावर असलेल्या फ्लॅटमध्ये आग लागल्याची माहिती मिळाली. या आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या पाच गाड्या घटनास्थळी पोहोचल्या. अग्निशमन दलाच्या पथकाने आग आटोक्यात आणण्यासाठी खूप प्रयत्न केले. दिलासा देणारी गोष्ट म्हणजे आग फक्त पहिल्या मजल्यापुरती मर्यादित होती. सर्वत्र धुराचे लोट परिसरात पसरले आहे.
मुंबई अग्निशमन विभागाने सांगितले की, घटनेची माहिती मिळताच आमची टीम तात्काळ घटनास्थळी पोहोचली आणि आग विझवण्यास सुरुवात केली. या घटनेत एका महिलेचा मृत्यू झाला तर ६ जण जखमी झाले. जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेमागील नेमकं कारण या हे अद्याप स्पष्ट नाही.
यापूर्वी ९ मार्च रोजी मुंबईतील गोरेगाव परिसरातील दिंडोशी येथील बागेश्वरी मंदिराच्या मागे असलेल्या जमिनीत भीषण आग लागली होती. आगीमुळे जवळपासच्या दुकानांचे आणि झोपडपट्ट्यांचेही मोठे नुकसान झाले आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या बारा गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आणि आगीवर नियंत्रण मिळवले. तथापि, या घटनेत कोणीही जखमी झाल्याचे वृत्त नाही ही दिलासादायक बाब आहे. आगीमुळे आजूबाजूच्या परिसरात धुराचे लोट पसरले, त्यामुळे तिथे राहणाऱ्या लोकांमध्ये आणि दुकानदारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.