लहान मुलांना Heart Attack येण्याआधी शरीरात दिसून येतात 'ही' गंभीर लक्षणे
हल्ली कोणत्याही वयातील हार्ट अटॅक येतो. त्यामुळे लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं आपल्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. जीवनशैलीत होणाऱ्या बदलांचा परिणाम लहान मुलांच्या सुद्धा आरोग्यावर लगेच दिसून येतो. आहारात होणारे बदल, जंक फूडचे अतिसेवन, तासनतास मोबाईल लॅपटॉप पाहत राहणे, अपुरी झोप, बिघडलेली पचनक्रिया इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम लहान मुलांच्या शरीरावर दिसून येतो. हृदयाचा रक्तपुरवठा अचानक थांबल्यामुळे शरीराला व्यवस्थित ऑक्सिजन पुरवठा होत नाही. हा रक्तपुरवठा कोणत्याही कारणामुळे थांबू शकतो. हृदयाला व्यवस्थित रक्तपुरवठा न झाल्यामुळे हृदयाच्या पेशी मरण पावतात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला लहान मुलांमध्ये हार्ट अटॅक येण्याआधी शरीरात कोणती लक्षणे दिसून येतात, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत(फोटो सौजन्य – istock)
बऱ्याचदा लहान मुलांच्या छातीमध्ये वेदना होणे किंवा अस्वस्थता वाटू लागते. ऍसिडिटी किंवा अपचनाची समस्या समजून दुर्लक्ष केले जाते. पण असे न करता तातडीने डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करणे आवश्यक आहे. छातीमध्ये वाढलेल्या वेदना काही वेळापुरत्या असतील तर दुर्लक्ष न करता वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. काहीवेळा छातीत वेदना होण्यासोबतच छातीमध्ये जडपणा सुद्धा जाणवू लागतो.
लहान मुलं चालताना किंवा उभे राहिल्यानंतर कायमच धापा टाकत असतील किंवा श्वास घेण्यास त्रास जाणवत असेल तर दुर्लक्ष न करता तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. हृदयाच्या रक्तवाहिन्या ब्लॉक झाल्यानंतर किंवा हृदयाला व्यवस्थित ऑक्सिजन पुरवठा न झाल्यामुळे हृदयाची कार्यक्षमता बिघडून जाते. त्यामुळे शरीराची योग्य काळजी घेणे आवश्यक आहे.
थंड वातावरण जर तुमच्या मुलांना कायमच घाम येत असेल तर याकडे दुर्लक्ष न करता तातडीने डॉक्टरांचा सल्ला घेऊन उपचार करावेत. अन्यथा कोणत्याही क्षणी मुलांना हार्ट अटॅक येऊ शकतो. तुमच्या मुलांना रात्रीच्या वेळी खूप जास्त घाम येत असेल तर हे हार्ट अटॅकचे लक्षण असू शकते. हृदयाचे कार्य बिघडल्यानंतर शरीराला जास्तीचा घाम येतो.
हृदयविकाराच्या झटक्याची सामान्य लक्षणे:
छातीत दुखणे, दाब जाणवणे, जड वाटणे किंवा जळजळ होणे हे मुख्य लक्षण असू शकते. हे दुखणे खांदे, हात, मान, जबडा किंवा पाठीमध्ये पसरू शकते.अचानक खूप जास्त थकवा येणे किंवा पूर्वी सहजपणे करता येणाऱ्या गोष्टी करताना दम लागणे.
हृदयविकाराच्या झटक्याची मुख्य कारणे:
हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्यांमध्ये प्लेक जमा झाल्यामुळे रक्तप्रवाहात अडथळा निर्माण होतो. याला ‘कोरोनरी धमनी रोग’ म्हणतात, जे हृदयविकाराच्या झटक्याचे सर्वात सामान्य कारण आहे.